पान:मृच्छकटिक.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८ रघुनाथ यादव-विरचित माघारे जावे. जे जे तुम्हांस आमचे पारिपत्यास्तव घेऊन आले असतील त्यांनी तरी कोणती किफायत पाहिली ? आम्ही तुम्हांस एकंदर दबून राहणार नाहीं. आम्हीं सर्व गोष्टींनीं तरतूदार आहोत. हिंदूपत बादशाहीचे वगैरे माणूस मातबर उमदे दौलतकर्ते पंतप्रधान बहादूर आहेत. त्यांजवर सर्व राज्याचा भार आहे. चार लक्ष फौजेचे बादशहा श्रीमंत छत्रपती महाराज सातारकर, त्यांचा जय प्रताप विक्रम वरदहस्त आमचे मस्तकी आहे. सर्व धरित्रीचे राज्य स्वामिकृपेने संपादितों. आजपर्यंत संपादीतच आलों. तुमचे हुकुमाची तमा धरीत नाहीं. लढाई करावी हाच आमचा निश्चय आहे." असे साफ सांगितले. व सदाशिवपंतांनी आपले तर्फेने लक्ष्मण बल्लाळ व बरूणशा या उभयतांस इराणीकडे वकिलीस पाठविले. त्यास तेथे बोलण्याची आज्ञा झाली जे, “ तुम्ही फौजेसुद्धां माघारे जावे, उद्यां येथे राहावयास दरकार नाहीं." आज्ञेप्रमाणे वकिलांनी मजकूर निवेदन करितांच अबदल्लीस परम विषाद आला. आणि तेच क्षणीं भाऊसाहेबांकडील वकिलांस अवकाश न घेतां माघारे रवाना केले. आणि सांगोन पाठविलें कीं, उदईक लढाईस तयार होणे. आम्ही चालून येतों. १४. सरदार बोलावून सरफराई याप्रमाणे वकिलांचीं कठोरपणाची भाषणे सदाशिवपंतांनी समजून घेऊन, मजालस४ करून, तमाम लहान थोर सरदार बोलावून आणून सरफराई केली. मोत्यांच्या कंठ्या व शिरपंच व जडावाची कडी व कलग्या" व तुरे, चौकडे व मंदील व शालजोड्या व बादली चिरें व घोडे व हत्ती व पालख्या व वस्त्रे व अबदागीर व फत्ते जाहल्यावर मानपानाच्या ताजिमा व कोणास गांव व परगणा व कोणास सचंतर १० एक देशींचे राज्य, अवांतर सरदार लोकांची मनाधारणेची बोलणीं बोलून, सदरहूप्रमाणे बक्षिसे देऊन, (१) तरतूददार-उपायवान, व्यवस्थापक. (२) तमा-धास्ती, पर्वा. (३) दरकार-गरज. (४) मजालस-सभा. (५) कलगी-पागोट्यावर खोचण्याचे रत्नभूषण. (६) मंदील-जरीचा फेटा. (७) बादली चिरे-जरतारी वस्त्र (८) अबदागीर-मिरवणुकीच्या वेळी धरावयाची छत्री. (९) ताजिमाअभ्युत्थान, बहुमान. (१०) सचंतर-स्वतंत्र, मुक्त. ।