पान:मृच्छकटिक.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथ यादवे-विरचित स्वार' मिळोन बहूत जायां जाहले. जखमी माणूस बहूत जाहले. सुजात दौले याजवर लढाईचा मोठा कहर वर्षला. सनसूरअलीकडे लढाईचा प्रसंग थोडा बहूत पडला. हातघाईमुळे मनसुरअलीकडील लोक साडेसातशें कामास आले. शिवाय सहस्रा वधी२ जखमी जाहाले. हस्ती नग पंधरा व उंट नफर दीडशे, येणेप्रमाणें ठार पडले. अबदल्ली शिकस्त खाऊन फौजेसुद्धा मागे सरून आपले गोठांत गेले. सुजात दौले व मनसूर अली आपआपले गोठांत गेले. मराठे यांणीं लढाईची शर्थ केली. आजपर्यंत तिमिरलंगापासून वहूत दिल्लीच्या सिंहासनावर बादशाहा जाहाले. पंड पाळेगार व रजपूत, रांगड व मेवाती, मारवाडी इत्यादिक जाहाले, परंतु अशी लढाईची मर्दुमी कोणीही केली नसेल. मराठी फौज आम्हांस मोजता दिसत नाहीं याजकरिता मोठ्या तर्तुदीने आपल्या लष्कराभोवते छबीने ६ रांत्र दिवस मोठ्या मोठ्या सरदारांचे नेमून देऊन हुशारीने राहिले. १२. इराणीतर्फे वकिलो या उपर इराणी व सदाशिवपंतांनीं दम खाऊन, आपल्या गोठासमीप चवक्या पहारे कडोविकडीचे ७ ठेवून तयारीतच उभयतां होते. अशा अवकाशांत इराणी यांणी आपल्या तर्फेनीं आणखी एक वेळ वकील पाठवावा असा सिद्धांत करून, सुजात दौले व मनसूर अली या उभयतांचे संमत घेऊन, रहिमतखां व रसूल पठाण व मणिराम रजपूत व महादाजी सुभानराव ऐसे चौघेजण पाठविले, कारण कीं, " तुम्ही जोरावर होऊन अटकेची सरहद्द व मारवाड व लाहूर प्रांत व बंगाला व अंतरवेद व काशी व प्रयाग व गया व काश्मीर पावेतों मुलूख काबीज करावयाची उमेद धरून बादशाई खजीना (१) सांडणीस्वार-उंटावरील, डाकेचे शिपाई. (२) नागपूर प्रत व पुणेप्रत २ रजपूत, रांगडे व पठाण व कायस्थ व मारवाडी. (३) शिकस्तपराभव. (४) तिमिरलंग-तैमूरलंग. (५) पाळेगार-डोंगरात राहणारे लुटारू-महालकरी. (६) छबीना-पहारा. (७) कडोबिकडी-नाना प्रकार. (८) महादाजी सुभानराव इकडे कसा ? अशी शंका का. ना. साने यांनी काढली आहे.