पान:मृच्छकटिक.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१० रघुनाथ यादव-विरचित जाहला. अगोदर श्रीमंतांनी दोन कोट रुपये हिंदुस्थानचे मोहिमेस भाऊसाहेबांकडे पाठविले व मल्हारजी होळकर यांजकडील खजिन्यांतील एक कोट व जनकोजी शिंदे यांजकडील खजीना दोन कोट व शिवाय सरकारी दोन कोट रुपये मागाहून आले. एकून सात कोट रुपये लष्करांत पावले. आणखी ऐवज शहर पुण्याहून रवाना जाहला, तो लष्करात पावलाच नाही. वीस पंचवीस हजार फौजेला मार्ग फुटेनासा जहाला खजीना पाठविला तो सुरंजेस व उज्जनीस व नरवरास व भेलशास व अवांतर जागजागीं अटकून राहिला. लष्करचे कागदपत्र अगदीं बंद जहाले. तेव्हां कुभेरीकर जाट सुरजमल्लयांनी बंदोबस्त आपल्या तर्फने करून एक कोट रुपये लष्करांत पावते केले बंदेले आणि बागलकोटकर यांणी, व बंगालेखंडकर यांणी, व सवाईराम जयसिंग यांणी, चितोडकर यांणीं गुष्तरुपे खजीना पाठविला; तो कुंजपुरा-- वरच होता. त्याची बातमी बारग्यांचे फौजांस लागताच एकाएकीं जाऊन धोशा घालून खजीना लुटून नेला. तेथे मातबर अमिरांचे व पठाणांचे व रोहिल्यांचे कविले होते, ते अगदीच सांपडले ते लुटून फस्त केले आणि अटक करून ठेविले. सावकारी द्रव्य मातवरांचे व अमिरांचे वगैरे मुबलक बादशाही खजोना शहाजाफराचे वेळचा होता तो जोरावारीने ७ लुटून फस्त केला. एक ण नऊ कोट रुपये सरकार जामदारखान्यास दाखल जहाले. कुंजपुरा लटून दरोबस्त फस्त केला. द्रव्याची लष्करात महामुरी जहाली. तेव्हां तीन शेर धान्य मिळों लागले. खाण्यापिण्याची वगैरे सरंजामाची उठवण मोडली. या विरहित दिल्ली संस्थानचा मुलुख दरोबस्त मारून लुटून फस्त केला. ८. दुराणी यमुनातीरास, तोफांची सरबत्ती । ही हकीकत सुजात दौला यांणी इराणीस तपशीलवार लिहून पाठविली.


(१) याला आधार नाही. (२) जाटासंबंधीच्या पूर्वीच्या वर्णनाशी हे विसंगत आहे. (३) भिवंडी प्रत-बंगालखडीकर. (४) धोशा-झपाट्याचा हल्ला. (५) कबिले-कुटुंबे. (६) भिवंडी प्रत शहाजाद्याचे. नागपूर प्रत शहाजहाचे पुणे प्रत २, शहादानचे (७) जोरावारी-जबरदस्ती. (८) महामुरीसमृद्धी. (९) उठवण-आपत्ती. -7};"