पान:मृच्छकटिक.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रघुनाथ यादव-विरचित नवता. शाहा [ जहान ] बादशाहायांणीं बावन्न बादशाहा काबीज केले. अलमगीर" बादशाहांनीं प्रौढ प्रताप सामान्य केला नवता. इराणी, दुराणी, मुलतान, मस्कत, पुर्तकाल२ ज्यांचे दहशतीने थरथर कांपत होते, त्या बादशाहांची अनू गृहकलहामुळे अगदींच गेली. बादशाहीची जागा इराणी दुराणी आणि गिलचा यांस केवळ पायवाट जहाली. दौलतींत । मुरबी3 अमीर व दिवाण समजदार शाहाणा, नीतिवंत माणूस कोणी राहिला नाही. आम्ही फरजंद लहान माणूस न हों. जेणेकरून बादशाही सलामत" राहील तेच करावयास आलों आहों. ही गोष्ट पसंतीस न आणितां आमचा तुम्हांस बे विश्वास वाटून आला. हे तुमचे प्रत्ययास दिवसेंदिवस येईल. इराणी परम बादशाहीचा नाशकर्ता अबदल्ली यांणीं भर देऊन अगदीच बादशाही बुडवावी या विचारावर प्रवृत्त जाहला. आणि मनसूरअली व सुजात दौला वि] अवांतर कारभारी इराणी दुराणीकडे मिळाले. तुम्ही बादशाहीचे दुवागीर, इमानी आहां. आमचा वसवसा काडीमात्र न धरितां सर्व जमातीनिशीं एकदील होणे. इराणीचा हिशेब कोण धरितो ? आमचे खातरेत नाही. तुम्हांजवळ आम्हांविषयीं हरएक बाबे विशीं कफारत पडते, त्या गोष्टीवर न जावे. जे बदनजर धरून वर्तणूक करितील त्यांस त्यांचा कुलस्वामी पाहून घेईल. तुम्ही मुरबी सर्व जाणत असतां अगदीं छान न केला. नजरेने पाहून आम्हांस मग दोष ठेवावा. हे चांगलें नव्हे" याप्रमाणे बहूत प्रकारे युक्तिप्रयुक्तीनें बुद्धिवाद केला. परंतु जाट अविश्वासू, त्यांणीं भाऊसाहेबांस विश्वास दाखवून मनसूरअलीकडे व सुजात दौला याजकडे परस्परें सूत्र लावून इराणी सुद्धां भारी फौजेनिशी एकाएकीं दिल्लीस आणिलें. ते काली महासंकट दुर्घट प्राप्त जाहलें, जाट याचा भरंवसा पूर्ण सदाशिवपंत यांसि कळला. (१) अलमगीर-औरंगजेब, (२) पुर्तुकाल-पोर्तुगाल. (३) मुरबीजाणता. (४) फरजंद-पुत्र, पुत्रवत मानलेले. शाहू महाराजांस औरंगजेबाची कन्या पुत्रवत लेखी. (५) सलामत-सुरक्षित. (६) दुवागीर-हित चितणारे. (७) वसवसा–संशय, भीती. (८) कफारत-तंटा, तेढ. (९) छान-शोध,