पान:मृच्छकटिक.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३७) प्रसंग किंव। गोविंदपंत बुंदेले यांना मारल्यावर त्यांचे शिर अबदालीनें भाऊसाहेबांकडे पाठविलें हा प्रसंग यांच्या निवेदनांत सरधोपटपणाच आहे. विकारविचारांची खळबळ व्यक्त करण्यास अवसर असलेले हे प्रसंग बखरींत अगदींच रूक्ष पद्धतीने सांगितले आहेत. हे अपवाद वगळता इतरत्र रघुनाथ यादवाचे निवेदन समरसतेचे द्योतक आहे. एकंदरीत पाणिपतच्या बखरीत विविध साहित्यगुणांचा विलास आपल्याला पाहावयास मिळतो. रसोत्कटता, जिवंत व्यक्तिचित्रे, प्रभावी मनोदर्शन, वेचक समुदायचित्रे, बेधक वणने, उत्कंठावर्धन निवेदन, डौलदार शैली आणि मोहक व्यक्तित्वाविष्कार हे या बखरीचे उठावदार कलात्मक पैलू आहेत. या गुणविशेषांनीं मंडित झालेलो पाणिपतची बखर मराठी ब खरवाङमयांत मानाचे स्थान भूषवीत आहे. डॉ. सौ. कुसुम कुलकर्णी