पान:मृच्छकटिक.pdf/4

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.


संस्कृत-साहित्य-सरिता

 विशाल महासागराला असंख्य नद्या येऊन मिळत असतात. अशा अगणित नद्यांनीच अमर्याद सागर बन- लेला असतो. संस्कृत साहित्याचा महासागरहि असाच अनेक सरितांनी समृद्ध झालेला आहे. 'संस्कृत-साहित्य- सरिता' असे नाव दिलेल्या या वाङ्मयमालेतून आपली आदिभाषा जी संस्कृत तिच्यांतील उत्तम उत्तम वाङ्मयाचा कथारूपानें थोडक्यांत परिचय करून देण्याचे आम्ही योजिले आहे. संस्कृत वाचणारे थोडे आणि समजणारे तर त्याहून कमी. तेव्हां आजच्या सर्वसामान्य माणसाला, लिहिता-वाचतां येऊ लागलेल्या नवशिक्षितालाहि या संस्कृत-वाणीचा आस्वाद कसा घेता येणार ? परंतु त्यांना तो मिळणें तर आवश्यक आहे; कारण संस्कृत भाषेतील वाङ्मय हा आपला फार थोर वारसा आहे. तो गमावणे म्हणजे सर्वस्वच गमावून बसणे. यासाठीच संस्कृत भाषेतील थोर, प्रसिद्ध अशा वाङ्मयकृतींचे, नाटकांचे आणि काव्यांचे, कथासार आम्ही वाचकांपुढे सादर करीत आहोत.

 आम्ही असे समजतों कीं, देवभाषेतील या वाङमयीन

कलाकृतींचा परिचय करून देण्याची आमची ही योजना 

एक चांगली योजना आहे-एक सत्संकल्प आहे. आणि असे सत्संकल्प उत्तम रीतीने तडीला नेण्याचे काम जनताजनार्दनाचेच आहे. ते तसे घडो, हीच इच्छा.

—प्रकाशक