पान:मृच्छकटिक.pdf/32

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( ३१ )


दाखविली. आणि हात जोडून विचारलेंं, “ महाराज, आपली आणखी काय इच्छा आहे ?" आतांं हा शर्वीलक जुगारी व चोर राहिलेला नव्हता तर यशस्वी राज्य- क्रान्तीचा नेता आणि उज्जयिनीचा मंत्री बनलेला होता. तेंं ओळखूनच चारुदत्ताने सांगितले कींं, या भिक्षुला सर्व मठांचा कुलपति करा, या चांडाळांना चांडाळांचा नायक नेमा.

 इतक्यांत शर्वीलकाच्या शिपायांनीं पळून चाललेल्या शकाराला पकडून तेथेंं आणलेंं. शर्वीलकानें चारुदत्ताकडे पाहात विचारलेंं, " या नीचाला कसली शिक्षा करूंं ? कीं याला आतां याच सुळावर चढवूंं ?" शकाराला शिपाई वधस्तंभाकडे ओढीत नेऊंं लागलेंं तेव्हां तो चारुदत्ताच्या पायाला स्पर्श करून केविलवाणेपणाने म्हणाला, " क्षमा असावी. " चारुदत्ताला त्याची दया आली. "याला नगर कोतवाल म्हणूनच राहूंं दे" असे चारुदत्ताने दया- बुद्धीने सांगितलें.

 चारुदत्त सुटला आणि पालकाची दुष्ट राजवट गेली हे पाहून उज्जयिनींतील नागरिकांच्या आनंदाला पारावर उरला नाहीं.

 चारुदत्ताची पत्नी धूता सती जाण्यास निघाली होती. तिचा पाय आतां चितेवर पडणार इतक्यांत मैत्रेयाने येऊन सांगितले की, चारुदत्त सुटला; वसन्तसेना जिवंत आहे.