पान:मृच्छकटिक.pdf/29

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २८ )


 खुनाचा आरोप सिद्ध झाल्याचे जाहीर केलेंं. मात्र त्याला सुळावर न देतां देशांतून हद्दपार करावेंं अशी शिफारस त्याने पालक राजाकडे करून पाहिली. परंतु राजाने त्याला नकार दिला. अर्थातच चारुदत्ताला सुळावर चढविण्याचेंं ठरलें व त्याची रवानगी दक्षिण स्मशानाकडे झाली.

 चारुदत्त बिचारा या सर्व विरुद्ध परिस्थितींंत काय बोलणार ? त्याने इतकेंंच सांगितले की आपण निर्दोष आहोंंत; तेव्हां अग्निप्रवेश, विषपान किंवा जलसमाधि यांपैकी कोणतेंहि दिव्य आपण करण्यास तयार आहोंंत. परंतु त्याचे म्हणणे ऐकलें गेलें नाहीं.

 चारुदत्ताची वधयात्रा सुरू झाली. तथापि दक्षिण स्मशानांत पुरलेला तो सूळ चारुदत्तासाठींं नव्हता !

**

 सारी उज्जयिनी रडत होती. सज्जन आणि उदारधी चारुदत्ताच्या हातून असलें नीच कृत्य कधींहि घडणार नाहीं अशी प्रत्येक नागरिकाला खात्री वाटत होती. पण कायद्याच्या बंधनापुढेंं आणि जुलमी राजसत्तेच्या बळापुढेंं त्यांचे कांहींं चालण्यासारखे नव्हते.

 ‘द्रव्यलोभाने वसन्तसेनेचा खून केल्यामुळेंं चारुदत्ताला सुळावर चढविलेंं जात आहे हो ' अशी दवंडी त्याला सुळावर चढविण्यासाठींं घेऊन चाललेले चांडाळ पिटीत