पान:मृच्छकटिक.pdf/28

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २७ )


बनवून द्या त्याला." परंतु एकदां दिलेला अति मौल्यवान रत्नहारहि परत न घेणारी चारुदत्ताची पत्नी धूता ज्या घराची स्वामिनी होती तिथे हे दान कसे स्वीकारलेंं जाणार ? वसन्तसेना निघून गेल्यानंतर तिची भेट न होतांच चारुदत्त व मैत्रेय घरी परत आले होते. चारुदत्ताला त्या दागिन्यांची हकीकत समजताच त्यानेंं ते दागिने मैत्रेयाच्या हातीं वसन्तसेनेकडे परत पाठवून दिले. परंतु मैत्रेय वसन्तसेनेच्या घरी जाऊन पोहोचण्याच्या पूर्वीच चारुदत्ताला न्यायालयांत बोलावणे आलेंं आणि मैत्रेयाला ती हकीकत रस्त्यांतच समजून त्याने तिकडे धाव घेतली.

 मैत्रेय न्यायालयांत आला तेव्हां समोरच फिर्यादी शकार दिसला. त्याबरोबर मैत्रेयाचा सात्त्विक संताप इतका भडकून उठला कीं तो त्याच्या अंगावर धावूनच गेला. परंतु त्या झटापटींत त्याच्या खाकेंंत असलेले दागिन्यांचेंं गांठोडे एकदम खाली पडले. ' हे तर वसन्तसेनेचे दागिने!' शकाराच्या ते लक्षात येतांच त्यानेंं एकदम त्याच्यावर झडप घालून ते न्यायाधीशासमोर ठेवले. “ हा घ्या पुरावा !" शकार ओरडला. " चारुदत्ताचा मित्र मैत्रेय याच्यापाशीं निघालेले हे दागिने सिद्धच करीत आहेत कीं चारुदत्तानेंंच या द्रव्याच्या लोभाने वसन्तसेनेचा खून केलेला आहे. आतां न्यायाला उशीर नको."

 आतां मात्र न्यायाधीशाचा नाइलाज झाला. त्यानेंं चारुदत्ताला पकडण्याचा हुकूम देऊन त्याच्याविरुद्ध