पान:मृच्छकटिक.pdf/27

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २६ )


लागला, " यानेंच, यानेंंच केला वसन्तसेनेचा खून !" तेव्हा मात्र चारुदत्त भानावर आला आणि संतापाने थर- थरत उत्तरला, “ हें नीच कृत्य तुझ्याच हातून घडलेलेंं आहे. याची साक्ष तुझे कांपरे बोलणे, काळे ठिक्कर पड- लेले ओठ आणि भेदरलेला चेहरा हींंच देत आहेत."

 परंतु प्रत्यक्ष पुरावा चारुदत्ताच्या विरुद्ध जात होता. बरेंं, आपल्या गाडीतून वसन्तसेना यावयाची होती ती आलींं नाहीं, तिच्या ऐवजी आर्यक त्या गाडीत होता हे सांगण्याची चारुदत्ताला सोय नव्हती; म्हणजे त्याची मान आयतीच राजद्रोहाच्या फांसांत अडकली असती. याशिवाय आणखी एक बळकट पुरावा प्रत्यक्ष न्यायालयांत आपल्या पायांनीं येऊन त्याच्याविरुद्ध उभा राहिला !

 तोहि एका मोठा क्रूर योगायोगच होता. त्याच दिवशीं सकाळीं चारुदत्ताच्या घरून उद्यानांत जाण्याच्या तयारींंत वसन्तसेना होती. रोहसेनाने रडून रडून आकांत मांडला होता. अर्थातच वसन्तसेनेनेंं दासी रदनिकेला विचारले कींं, ‘ बाळ कां रडतो आहे?' बिचारी रदनिका! तिनेंं डोळ्यांत पाणी आणून सांगितले की, शेजारच्या घरची सोन्याची गाडी पाहून यानेंहि सोन्याच्या गाडीसाठी हट्ट धरला आहे. त्याची मातीची गाडी त्याला नकोशी झाली आहे.

 वसन्तसेनेनें क्षणभर विचार केला आणि आपल्या अंगावरील बहुमोलाचे अलंकार उतरून ते रोहसेनाच्या मातीच्या गाडीत ठेवीत म्हटलेंं, “ याची सोन्याची गाडी