पान:मृच्छकटिक.pdf/26

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २५ )

लादावे ?' विचार करता करता एकदम एक कुटिल कल्पना शकाराच्या मेंदूत चमकली. शकार हा स्वतः नगरकोतवाल होता. तेव्हा एखाद्याविरुद्ध खुनाची फिर्याद त्यानेंं दाखल करणे हे अगदीच साहजिक वाटण्यासारखेंं होते. त्याचा फायदा घेण्याचे ठरवून त्यानेंं न्यायालयांत फिर्याद गुदरली कीं, चारुदत्ताने पैशाच्या लोभानेंं उद्या- नांत वसन्तसेनेचा खून केला आहे.

 परंतु न्यायाधीशाला शकाराच्या दुष्ट कारवायांची चांगली माहिती होती. आतांपर्यंत त्यानेंं अशा कितीतरी निरपराध्यांचे जीव घेवविले होते. त्यामुळेंं चारुदत्ता- सारख्या उदारचरितावर केलेल्या या आरोपाकडे त्यानेंं प्रथम दुर्लक्षच केलेंं. परंतु फिर्यादी पडला राजाचा मेहुणा. त्याने सरळ न्यायाधीशालाच धमकी दिली कींं, जर या फिर्यादीची सुनावणी झाली नाहींं तर राजाला सांगून तुमची न्यायाधीशाच्या जागेवरूनच उचलबांगडी करवीन. तेव्हां न्यायाधीशाला त्याच्यापुढे नमणेंं भाग पडले.

 फिर्याद दाखल झाली. पहिली साक्षीदार म्हणून वसन्त- सेनेच्या आईचा पुकारा झाला. तिने येऊन सांगितले कींं, "काल वसन्तसेना चारुदत्त शेठकडे गेली होती." त्या- नंतर चारुदत्ताला बोलावणे गेलेंं. तो येऊन पोहोंचला. चारुदत्ताला न्यायाधीशाने प्रश्न केला कींं, “ वसन्तसेना कोठे आहे ?" त्याने सरळपणे उत्तर दिले कींं," ती काल माझ्या घरींं आली होती पण आज सकाळी परत गेली."

 परंतु शकार चारुदत्ताकडे पाहून बडबड करायला