पान:मृच्छकटिक.pdf/25

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २४ )

गाडींतून तसेच सुरक्षित स्थळी जाऊंं दिले; परंतु आपण मात्र तेथून लगेच काढता पाय घेतला.

 शकाराची गाडी उद्यानांत ठरल्या ठिकाणींं म्हणजे जेथे शकार गाडीची वाट पाहात थांबला होता तेथे सरळ निघून आली. गाडी आली म्हणून शकाराला हायसेंं वाटलेंं. विटानेंं गाडीचा पडदा बाजूला केला, तों आंत प्रत्यक्ष वसन्तसेना. म्हणजे शकार जिच्या भेटीसाठींं अगदीं भुकेला होता ती अकस्मात तिथे जीर्णोद्यानांत येऊन हजर झालेली.

 मग शकाराच्या प्रेमलीलांना ऊत येणारच ! परंतु वसन्तसेना अशाने बधणारी नव्हती. तिनेंं शकाराची खूप निर्भर्त्सना केली. त्याला झिडकारून टाकलेंं. एवढेच नव्हे तर तिने त्याला लाथेने ठोकरून दिलेंं. आतांं मात्र शकार भडकला. त्याने निराशा आणि संताप यांच्या भरांत वसन्तसेनेचा गळा दाबला. ती मेली असे समजून त्या दुष्टाने तिला जमिनीवर टाकलेंं आणि तिच्या अंगावर पालापाचोळा रचून तो मोकळा झाला. पण त्याला एक भीति वाटत होती-'या पापाला वाचा फुटेल !' चेटानेंं तर तो खून प्रत्यक्षच पाहिलेला. तेव्हा त्याचा बंदोबस्त आगाऊच करावा म्हणून त्याने चेटाला बांधून अंधार- कोठडींंत फेकून दिले. दुसरा मित्र विटहि बरोबर होता. परंतु त्यानेंं तरवारीचा धाक दाखवितांच शेळपट शकाराने त्याच्या वाटेला जाण्याचे सोडून दिलेंं.

 'मग आतां हें खुनाचेंं पाप कोणाच्या डोक्यावर