पान:मृच्छकटिक.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २३ )


आंत बसलें याची जाणीव होतांच वर्द्धमानकानें ती वसन्त- सेनाच समजून गाडी जोराने पिटाळली.

 परंतु वाहनांची तपासणीं सुरू होती. पळालेल्या आर्य- काला पकडण्यासाठी रस्ते रोखले गेले होते. चारुदत्ताची गाडी पुढे येतांच चंदनक नांवाच्या एका अधिकाऱ्यानेंं तिच्या तपासणीसाठी गाडीचा पडदा बाजला केला. तों आत आर्यक बसलेला. चंदनक घडू पाहात असलल्या राज्य- क्रान्तीविषयी सहानुभूति बाळगणारा होता. त्याने पाहिलेंं कीं, गाडी अशीच पुढे जाऊ दिली तर आर्यकाला वांच- विल्याचे श्रेय लाभेल आणि राज्यक्रान्तीला सहाय्य होईल. तेव्हां त्याने गाडी तशीच पुढे जाऊं दिली. परंतु दरम्यान जवळच असलेल्या वीरक नावाच्या दुसऱ्या एका अधि- काऱ्याला चंदनकाबद्दल संशय आला. त्याने त्याला उलट- सुलट प्रश्न विचारावयास सुरुवात केली. परंतु चंदनकानें त्याला उडवून लावलेंं. त्यामुळे वीरक संतापला आणि न्यायालयांत फिर्याद देण्यासाठी निघून गेला.

 चंदनकानेंं जाऊ दिलेली चारुदत्ताची गाडी उद्यानांत येऊन पोहोंचली. चारुदत्ताने उत्सुकतेने दार उघडलेंं; पण तेथे वसन्तसेनेऐवजी तुरुंगांतून पळालेला ‘राजद्रोही' आर्यंक त्याला दिसला. चारुदत्ताला त्या बिकट परिस्थिती- ची आणि तिच्या संभाव्य भयंकर परिणामाचीहि कल्पना आली. त्यानेंं आर्यकाच्या बेड्या तोडविल्या आणि आपल्या