पान:मृच्छकटिक.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २२ )


ठेवण्याचेंं राहून गेले आहे. म्हणून तो गाडी घेऊन तसाच परत गेला.

 एवढ्यांत शकाराची गाडी त्याच रस्त्यानेंं चालली होती, ती नेमकी चारुदत्ताच्या घरासमोर अडून राहिली. बाजाराचा दिवस असल्यानेंं पुढला रस्ता तुडुंब भरून गेला होता. आणि शकाराच्या गाडीला पुढेंं रस्ता मिळत नव्हता. शकाराने आपला सारथी स्थावरक चेट याला गाडी जीर्णो- द्यानांत घेऊन येण्यास सांगितलेलेंं होतेंं. त्याप्रमाणेच चेट निघाला होता.

 आणखी एक भानगड नेमकी याच वेळींं झाली होती. पालक राजाविरुद्ध बंड करणारा आर्यक बंदीखान्यांत पडला होता. तेथून त्यानेंं आपली सुटका करूत घेतली होती. आर्यक तुरुंगांतून पळाल्यामुळे जिकडे तिकडे गडबड उडून गेली होती. सर्वत्र धांवाधांव नि शोधाशोध चालू होती. प्रत्येक वाहन तपासण्याचे हुकूम सुटले होते. सारे सरकारी अधिकारी गडबडून गेले होते.

 आणि तुरुंगांतून निसटलेला आर्यक आला तोहि नेमका चारुदत्ताच्या घरापुढील रस्त्याने. यावेळपर्यंत वर्द्धमानकानें तक्के-लोडांसह गाडी आणून दारापुढे उभी केली होती. चारुदत्ताच्या ह्या गाडीचे पडदे वर सारलेले होते. आर्य- काला योग्य संधी सांपडली. तो पटकन त्या गाडींत जाऊन बसला आणि त्यानेंं पडदे बंद करून घेतले. कोणीतरी