पान:मृच्छकटिक.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २१ )


 चारुदत्ताची पत्नी धूता आणि त्याचा लहान मुलगा रोहसेन यांची वसन्तसेनेशी ओळख झाली. घरांतली सर्वच माणसे तिच्याशी प्रेमादराने वागलीं. वसन्तसेनेच्या मनावर त्याचा मोठा परिणाम झाला. तिला तें घर सोडून जावेसे वाटेना. बाहेर कोसळणारा मुसळधार पाऊसहि थांबण्याचींं चिन्हें दिसत नव्हती. त्यामुळे अखेर वसन्तसेना त्या रात्री चारुदत्ताच्या घरीच राहिली. दोन प्रेमी जीवांचे मीलन झालेंं.

 सकाळ उजाडली आणि चारुदत्त आदल्या रात्रींं ठरल्याप्रमाणे जीर्णोद्यानाकडे निघून गेला. वसन्तसेना साजशृंगार करून संकेताप्रमाणे त्याच्या भेटीसाठी त्याच्याच गाडीतून जाणार होती. चारुदत्ताने आपला नोकर वर्द्धमानक याला तशी सूचना देऊन ठेवली होती.

 वसन्तसेना मोठ्या उल्हसित मनाने दाराशींं आली आणि दारासमोर दिसली त्या गाडींत सरळ जाऊन बसली. गाडी चालू झाली. आता लवकरच प्रिय चारुदत्ताची मनमुराद भेट होईल, या आनंदांत वसन्तसेना जीर्णोद्यान येण्याची वाट पाहात राहिली. परंतु ती बसली होती ती गाडी चारुदत्ताची कुठे होती ! ती होती शकाराची. आणि वसन्तसेना चुकून तींत जाऊन बसली होती.

 म्हणजे तो एक मोठाच घोटाळा झाला होता. चारु- दत्ताचा सारथी गाडी जोडून दारापुढे येऊन उभा राहिला, परंतु नंतर त्याच्या ध्यानात आले की गाडींत लोड-तक्के