पान:मृच्छकटिक.pdf/19

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.मदनिकेची शंका बरोबर ठरली. आपल्या मालकिणीचेच हे दागिने आहेत याविषयी तिची खात्री पटली. हे दागिने मालकिणीला देणेंं म्हणजे चोरी कबूल करण्यासारखेंंच होते. परंतु हे दागिने नाहींंत म्हणजे आपली सुटका नाहीं आणि आपली सुटका नाही म्हणजे शर्वीलकाच्या प्रेमाची पूर्तता नाहीं, हे मदनिका ओळखून होती. ती उदास झाली. तिने क्षणभर विचार केला आणि वसन्तसेनेच्या दासीला शोभेसेंच बोलली, "आर्य, आतां असे करा. हे दागिने घ्या आणि वसन्तसेनेपुढे जाऊन म्हणा, 'चारुदत्तांनींं हे आपले दागिने माझ्या हातीं परत पाठविले आहेत.' आपण चारुदत्ताचे नोकर असल्याची बतावणी करा म्हणजे झालें."

 शर्वीलकाचाहि नाइलाज होता. त्याने मदनिकेचे म्हणणेंं मान्य केलेंं. 'निदान चोरीच्या आरोपांतून सुटलों,' तो मनाशी म्हणाला. परंतु त्याला काय माहीत की आपले संभाषण पलीकडच्याच दालनांत बसलेल्या वसन्तसेनेने सारेंं सारेंं ऐकलेलेंं होतेंं !

 दागिने पुढे ठेवून शर्वीलकाने ठरल्याप्रमाणे गंभीरपणाने म्हटले, “ बाईसाहेब, हे आपले दागिने घारुदत्तांनी पाठविले आहेत."

 वसन्तसेनाहि तितक्याच गंभीरपणानेंं म्हणाली, “आर्य, चारुदत्तांकडून मला पूर्वीच निरोप आला आहे. द्या ते दागिने इकडे आणि मदनिकेला आपल्याबरोबर घेऊन