पान:मृच्छकटिक.pdf/11

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १० )

जोराने वाहात होता. चारुदत्ताचा मुलगा रोहसेन सोप्या- वर झोपला होता. रोहसेनाला गार वारा बाधेल म्हणून त्याला आंत नेऊन झोंपविण्यासाठी चारुदत्ताने आपल्या अंगावरची शाल त्या अंधारांत रदनिका समजून वसन्त- सेनेच्या अंगावर फेकली. आपल्या प्रियकराच्या अंगावरील वस्त्र अशारीतीने आकस्मिकपणे आपल्या हाती आल्याने तिला केवढा आनंद झाला ! तिने चारुदत्ताची गैरसमजूत दूर करण्याचा प्रयत्न न करतां पहिल्याने ती शाल स्वतः- च्या अंगाभोंवतीं लपेटून एक प्रकारचे सुख अनुभवले. आणि मग तिने रोहसेनाच्या अंगावर ती घातली.

 थोड्या वेळानें रदनिका व मैत्रेय बळी टाकून घरांत परत आली तेव्हा मात्र चारुदत्त बुचकळयांत पडला. मग मगाशीं रदनिका समजून आपण शाल अंगावर फेकली ती कोणा स्त्रीच्या ?' पण त्याच्या या प्रश्नाचे उत्तर स्वतः वसन्तसेनेनेच पुढे होऊन दिले. अर्थातच दासी समजून आपण वसन्तसेनेसारख्या एक गुणवती परस्त्रीला काम सांगितलें याबद्दल चारुदत्ताला वाईट वाटले. त्याने लगेच तिची क्षमा मागितली. परंतु आपण सांगितलेले इतकें क्षुल्लक काम तिनेंं केलेंं हे पाहून त्याला तिच्या प्रेमाचेंंहि कौतुक वाटले.

 चारुदत्तानें क्षमायाचना केली, पण उलट वसन्तसेनाच त्याला म्हणू लागली की, मी आपली परवानगी न घेतांच आपल्या घरांत आलेंं तेव्हा आपणच मला क्षमा करा- यला हवी.