पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/99

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

'अतिस्नेहः पापशङ्की'

अंदाज केला होता. परंतु इराकचे 'पुरुषोत्तमदास' सर ससून अफंदी म्हणून एक वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध गृहस्थ आहेत, त्यांच्या अदमासाने ही रक्कम पांच कोटी रुपयांची असावी. हिंदुस्थानच्या आर्थिक परिस्थितीवर याचा काय बरावाईट परिणाम होतो हे आर्थिक तज्ज्ञांनीच सांगावे. प्रस्तुत लेखकाचा तो अधिकार नव्हे. इराकी मंत्रिमंडळाची एक योजना अद्याप मूर्त स्वरूपांत आली नाही. त्यायोगे एक राष्ट्रीय पेढी निर्माण करून सुवर्णनाणे पाडण्याचा फडणिसांचा विचार आहे. नोटा काढण्याचाही अधिकार त्याच पेढीला देण्यात येईल. पण घोडे पेंड खाते ते भांडवलासंबंधी ! राष्ट्रीय कर्जाविना हे कार्य होणार नाही आणि मँडेटरी सत्तेच्या सावलीत वाढणारे धनिक कर्ज देण्यास सहसा राजी नसतात. तरीही कांही स्वतंत्र व्यवस्था करून लवकरच बँक स्थापन करण्याचा आपला निश्चय फडणिसांनी 'केसरी'च्या प्रतिनिधीस सांगितला.

 खानाकीन येथील हिंदी बंधूनी प्रस्तुत लेखकास इराणांत एकटें न जाण्याची मनापासून विनंती केली. "तिकडील लोक अशिक्षित, खेडवळ; अतएव ' हिंदु' गृहस्थास त्यांपासून साहजिकच भीति असावयाची. शिवाय वाटेंतील रस्ते बर्फमय झाल्याने मोटारी अडकून पडण्याचा संभव. मग अशा ठिकाणी तुमचे कसे होईल ? बर्फमय प्रदेशांत रहाण्याची तुम्हांस कधीच संवय नाही. मुंबईपुण्याकडील लोकांना ही हवा सोसवेल कशी ? तेहरानला तर हिंदी गृहस्थ कोणीच नाही. फार्सीचे ज्ञानही तुम्हांस पुरेसे नाही, तेव्हा तुम्ही यावेळी जाऊंच नका. आम्हांला फार काळजी वाटते." अशा अगदी आपलेपणाच्या प्रेमळ विचारजन्य भीतिप्रद शंका हिंदी बंधूस वाटल्या. लोक कितपत शिक्षित आहेत, हे पहाण्यासाठी तर आपण जावयाचें. बर्फाची

९३