पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/92

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

 आणखीही थोडे खोलांत शिरल्यास फारच मनोरंजक माहिती मिळेल. हिंदी लोकांस दोनच जाहीरनामे ठाऊक आहेत. एक १८५७ सालचा आणि दुसरा कपिलाषष्ठीप्रमाणे साठ वर्षांनी १९१७ सालीं दिलेला. या दोन्ही जाहीरनाम्यांची किंमत किती आहे हें गुलदस्तांतच राहू द्या. इराकला असे किती तरी जाहीरनामे मिळाले आहेत आणि इराकवर ब्रिटिश अंमल सुरू होऊन, नव्हे इराकच्या पालनपोषणाचें कार्य इंग्रजी राज्यकर्त्यांवर येऊन, अगदी थोडा काल झाला असली तरी, जाहीरनामे खिरापतीप्रमाणे वाटले गेले आहेत असे दिसतें.
 "ग्रेटब्रिटनची उच्च आकांक्षा तुर्कांचे साम्राज्य ( ऑटोमन एम्पायर ) अबाधित ठेवण्याचीच आहे. पण आमच्याविरुद्ध जर्मनीच्या बाजूने लढण्यास प्रवृत्त झाल्याने ते साम्राज्य सुरक्षित राखणे अशक्य आहे. अरबांना तुर्कांंचा जुलूम जाणवत आहेच. तुमची धर्म आणि तुमचे स्वातंत्र्य तुम्हांसाठीच राखण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करू."
 "ब्रिटिश सत्तेखाली पुरातन कालापासून (?) लक्षावधि मुसलमान प्रजानन आहेत. जगांतील कोणत्याही राज्यकर्त्यांच्या अमलाखाली इतकी इस्लामी प्रजा नाही ( ? )." ( प्रश्नचिन्हें लेखकाची आहेत.)
 "तुम्हांला धार्मिक आणि घरगुती बाबतींत स्वातंत्र्याचा आणि न्यायाचा आस्वाद चाखावयास मिळेल," ( भाषा बदलली. )
 "आमचे राज्य हें सन्मान्य (? ) ईस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेनुसारच चालविले जाईल.” (बिचारे अरब! ईस्ट इंडिया कंपनीच्या परंपरेचा पुरावा एडमंड बर्क त्यांना देता तर फार बरे झाले असते !)

 "आम्ही बगदादला जेते म्हणून येत नसून तुमची मुक्तता करण्यासाठी येत आहोत." ( आगींतून सोडवून फुफाटयांत पाडण्यासाठी ?)

८६