पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/87

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अल्लीबंधूंची खरी किंमत

लेखांमुळे त्यांना कारागृहवास सोसावा लागला तें—मला वाचता येईल का ? हिंदी राजकारणाची सांगोपांग चर्चा करणारे एखादें वर्तमानपत्र कोणते ? राजकारणाची साद्यंत माहिती देणारे एखादें हिंदी पुस्तक मला सांगाल काय ? अशा विविध प्रश्नांचीं यथामति उत्तरे दिल्यावर पुनः हिंदी मुसलमानांची बाब चर्चेस ओघाओघानेच आली.
 मला आता असे सांगा की,"महंमदअल्लींचे हिंदी राजकारणांत कितीसे वजन आहे ? त्यांचे बंधु सध्या काय करतात ? त्यांचा हिंदी राष्ट्रैक्याला विरोध अजून चालूच आहे का ? माझा अनुभव आणि मत मी तुम्हांला सांगतो. महंमदअल्ली बगदादला आले तेव्हा मोठे हिंदी राजकीय पुढारी म्हणून मी त्यांना भेटण्यास गेलों; पण भेटच झाली नाही. कांही स्थानिक हिंदी मंडळी भेटावयास गेली, तर त्यांना देखील मोठ्या तिरस्कारयुक्त दृष्टीचा लाभ आणि नंतर एक उपमर्दकारक पत्र इतका प्रसाद मिळाला. हिंदुस्थानांत बसून हे बोलघेवडे पुढारी अरबस्तानांतील आणि तुर्कस्तानातील मुसलमानांना मारे हुकूम पाठवितात; यांना माझा प्रथम प्रश्न असा की, तुम्हांला दुसऱ्यांची उठाठेव सांगितली कोणीं ? अगोदर आपल्या राष्ट्रांत तुम्ही एकी करा, मग आम्हांला उपदेशाच्या गोष्टी सांगा. स्वतः आपल्या देशबांधवांशी भांडणाच्या आणि आपल्या मातृदेशाची उपेक्षा करणाऱ्या इसमाला आम्ही काडीइतकाहीं मान देत नाही, मग त्याच्या हुकमाकडे ढुंकून तरी कोण पाहील १ खरेंच, यांना अंत:करण किंवा विचारशक्ति आहे की नाही हे मला कांही कळत नाही. माझा मुलगा हिंदुस्थानांत जन्मला व तेथे त्याचे शिक्षण वगैरे झाल्यावर तो स्वत:ला हिंदी म्हणवून घेऊ लागला तर, मला वाईट वाटणार नाही. मातृदेशापुढे इतर सर्व विचार रद्द केले

मु. ६
८१