पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/86

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

करतां येणार नाही ! पण एवढे मात्र खरें की, मी हिंदुस्थानांत जाण्याची इच्छा फार दिवस करीत आहे. कदाचित् आणखी दोन वर्षांनी मला त्या पूण्यभूमीचें दर्शन घेण्याचा सुयोग येईल. हिंदुस्थान म्हणजे सर्व जगांतील संस्कृतीचे आद्यस्थान असून इस्लामी, यहुदी. ख्रिस्ती इत्यादि धर्मसंस्थापकांना प्रेरणा हिंदी राष्ट्राकडूनच मिळाली आहे. हिंदुस्थानबद्दल मला अत्यंत आदर तर वाटतोच, पण त्याबरोबरच एवढे मोठे राष्ट्र इतक्या विपन्नावस्थेस का पोहोचले व ते स्वतंत्र का नाही म्हणून विषादही मनांत येतो ! सर्व जगाचे डोळे हिंदी राष्ट्रांकडे लागले असून भविष्यकाळांत लवकरच त्याचा भाग्योदय व्हावा अशी माझी मनापासून इच्छा आहे."
 इतके भाषण होताच हातांतील 'अनहॅपी इंडिया'च्या प्रस्तावनेतील एक महत्त्वाचा छेदक वाचून दाखवून ते गृहस्थ म्हणाले, "खरोखर लजपतरायांनी किती यथार्थ वर्णन केले आहे ! परिस्थितीचे वास्तविक ज्ञान त्यांना होते आणि त्याची कारणपरंपरा पण कशी पटण्याजोगी त्यांनी दिली आहे ! टिळक, लालाजी, गांधी, नेहरु यांसारखे पुढारी तुमच्या देशांत होतात हे तुमचे किती मोठे भाग्य!"
 नंतर 'आर्यसमाज ' ही काय संस्था आहे ? ती लालाजींच्या आधी 'डायानंडा सारास्वाटी ' (इंग्रजी लेखनानुसार उच्चार जशाचा तसा दिला आहे ), यांनी कशासाठी काढली इत्यादि माहिती अगदी कुतूहलपूर्वक विचारून घेतल्यावर हिंदुस्थानातील राजकीय पक्षांसंबंधी त्यांनी पुष्कळ प्रश्न विचारले.

 स्वराज्य हा कोणता पक्ष ? स्वराज्य म्हणजे काय ? गांधी अजून राजकारणांत भाग घेतात का ? हे त्यांनी जाणण्याची इच्छा दर्शविली. 'पाटेल ' कोणत्या पक्षाचे आहेत ? टिळकांचे वर्तमानपत्र–ज्यांतील

८०