पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/84

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

स्थानहून आला काय ?" असा प्रश्न केला. होकारार्थी उत्तर देतांच, "तुमच्या देशांतले मुसलमान असे वेड्यासारखे का करतात ते सांगाल का ?" म्हणून उत्कंठेने विचारलें ! हिंदूंशी त्यांचा तंटा होतो त्याचे कारण मशिदीपुढे वाद्ये वाजतात, असे सांगतांच संपादक म्हणाले की, "वाद्ये वाजलीं म्हणजे तंटा का व्हावा हे मला कळत नाही. बगदादमध्ये किती तरी प्राचीन मशिदी आहेत. पण त्यांच्यापुढे वाद्येंं वाजविण्याची मुळीच बंदी नाही. सर्व मिरवणुकीच्या वेळीं भर रस्त्यावर असणाच्या मशिदींवरून देखील सर्व प्रकारची वाद्येंं वाजवीत जातात. आमच्या प्रार्थनेत व्यत्यय येत नाही किंवा आमचे पित्तही खवळत नाही ! असे असतां हिंदी मुसलमानांना या खोड्या का जडाव्या ?" ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.
 मशिदींपुढे वाद्ये वाजल्यामुळे मुसलमान चिडतात, हे सांगितल्यावर संपादकमहाशयांना हसू आवरेना व ते म्हणाले,"खरोखर हिंदी मुसलमानांसारखे हटवादी तेच !"
 अल्लीबंधूच्या फाजील धर्माभिमानाबद्दलही निर्देश ओघाओघानेच आला ! त्यांच्यासंबंधी येथील पुढाऱ्यांनी दिलेले मत स्पष्टपणे न लिहिलेलेच बरें ! येवढ्यावर तरी त्यांचे प्रलाप आणि चेष्टा थांबतात की नाही ते पहाणे आहे. उपर्युक्त मुलाखतीत वस्तुस्थितीचे वर्णन केले असून अल्लीबंधुंना मिळालेली शेलकी विशेषणे प्रकट केली नाहीत. हिंदुस्थानांतील त्यांच्या पराक्रमाचे वर्णन इकडे वर्तमानपत्रांतून येणें दुर्घट असल्याने त्यांची खरी चहा येथे होत नसावी !

--केसरी, १९ मार्च, १९२९.


७८