पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/83

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

हिंदुस्थानविषयी इराकची अपेक्षा

नाही. परंतु, प्रथमतः लोकांची मनोभूमिका तयार करून मग सक्तीने सुधारणा लादाव्यात असे आम्हांस वाटतें.
 प्रश्न-स्वराज्य मिळविण्यासाठी हिंदी प्रजेने कोणत्या उपायांचा अवलंब करावा असे आपले मत आहे ?
 उत्तर--हिंदुस्थानच्या प्रश्नांची सांगोपांग माहिती नसली तरी वर्तमानपत्रांतील बातम्यांवरून हिंदु व मुसलमानांची फूट तेथे फार विकोपास गेली असे दिसते. या दोन्ही पक्षांची एकी झाल्याशिवाय आणि एक पुढारी नेमून त्याच्याच तंत्राने सर्वांनी चालल्याविना इष्ट फलसिद्ध होणार नाही असे माझे मत आहे. तुर्कस्तानांतील प्रजाजन मुस्ताफा केमालच्या आज्ञेनुसार वागतात; इराणी लोक रेझाशहाच्या शिकवणीस मान तुकवितात; म्हणून त्या देशांची प्रगति झाली. हिंदुस्थानांतही तसेच झाले पाहिजे.
 इतके बोलणे झाल्यावर मुख्य मंत्र्यांनी हिंदुस्थानकडून सर्व जगाला मार्गदर्शक ज्ञान मिळाले असल्याचे सांगितले. आणि हिंदुस्थानने लवकर स्वतंत्र होऊन इराकला स्वातंत्र्य मिळविण्यांत मदत करावी अशी इच्छा प्रगट केली. तेव्हा खाल्डिया, बाबिलोन इत्यादि ठिकाणच्या प्राचीन काळच्या राजांनी जशी जगतांत संस्कृति पसरविली तशीच हल्ली इराकने स्वतंत्र वृत्ति पौर्वात्य राष्ट्रांत स्वकृतीने पसरवावी अशी मनीषा मी दर्शविली. नंतर आभारप्रदर्शन, भेटीमुळे परस्परांना झालेला आनंद, आदबीचे हस्तांदोलन इत्यादि शिष्टाचार झाल्यावर ही मुलाखत संपली.

 अरबी पत्रकारांचे मत–पण अलीबंधु व त्यांचे मूठभर अनुयायी यांना मिळणारी शेलापागोट्यांची परंपरा कोठे थांबते ? 'स्वतंत्र' नांवाच्या वर्तमानपत्राच्या संपादकांना भेटतांच त्यांनी, "तुम्ही हिंदु-

७७