पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/78

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

सांगितली कोणी ? अशा अनाहूत ढवळाढवळीने ब्रिटिश सरकारच्या भेदनीतीस ते बळी पडतात; इतकेच नव्हे तर इंग्रजी मुत्सद्द्यांना चंचुप्रवेश करण्यास नवीं नवीं साधने ते उपलब्ध करून देतात.
  हा आरोप ऐकून कोणीही थक्कच होईल ! कारण बंधुद्वयांच्या इंग्रज राज्यकर्त्यांवरील गालिप्रदानाची प्रखरता सर्वश्रुत आहे. अर्थात मीही जास्त चौकशी करून खुलासा देण्याची विनंती केल्यावर श्री. गिलानी म्हणाले,
 "नकिबांचीच गोष्ट घ्याना. दोन वर्षांपूर्वी नकीब वारले, तेव्हा नवीन वारसासंबंधी प्रश्न निघाला. (नकीब म्हणजे बगदादमधील मुख्य धर्मगुरु. आपल्याकडील श्रीशंकराचार्यांसारखाच मान या नकिबांना मिळतो. हिंदी मुसलमान नकिबांना मानतात ). नकिबांची इस्टेट फार मोठी असून उत्पन्नही एखाद्या संस्थानाप्रमाणे असते. एवढी मोठी संपत्ति धार्मिक नांवाखाली वंशपरंपरेने एकाच व्यक्तीच्या हातीं रहाणे प्रचलित परिस्थितीत योग्य नसल्याने व त्या द्रव्याचा सदुपयोग व्हावा म्हणून येथील आम्ही सर्व मंडळींनी पंच नेमून व्यवस्था करण्याचे ठरविले. मात्र नकिबांच्या वडील मुलास या पंचायतीचा अध्यक्ष करण्याची अट होती. नकिबाची सर्व मंडळी या योजनेस अनुकूल होती आणि हा धार्मिक प्रश्न असल्याने ब्रिटिश सरकारला यांत ढवळाढवळ करतां येत नव्हती. पण शौकतअल्ली आहेतना ! त्यांनी तारांचा गोंधळ माजविला. ब्रिटिश सरकारपुढे तोंड वेंगाडून त्यांना या धार्मिक बाबतींत पडावयास लावले आणि अशा ठिकाणी लुडबुडण्यास सोकावलेल्या इंग्रजांना आयतेच फावलें ! राजे फैझल यांना अल्लीबंधूंनी तारा पाठविल्या, पुढाऱ्यांना हुकम सोडले आणि ब्रिटिशांची मनधरणी केली ! कशासाठी ? तर लक्षावधि

७२