पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/71

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अद्वितीय विदेही यंत्र

तापवून नंतर पुनः वायु सोडून थंड करणे या क्रिया आवश्यक असल्याने 'आचळाचे दूध आचळांस' लावण्यांची कमी खर्चाची युक्ति अमलांत आणणे हितावह होते. म्हणून अगदी आधुनिक शास्त्रीय उपाय अमलांत आणण्यासाठी शास्त्रज्ञांचा तांडा सारखा पोसावा लागतो. इतकेंही करून आगीची भयंकर भीति असतेच. त्यासाठी दक्षता बाळगावी लागते ती निराळीच !
 विदेही जनक राजाची अशी गोष्ट सांगतात की, त्याचा एक पाय अग्नींत असून दुसऱ्या पायास तूप चोळीत असत. अशाच प्रकारचे पण जनकावरही ताण करणारे एक यंत्र रॉकेल धुण्यासाठी उपयोगांत आणले जाते. जर्मन शास्त्रज्ञांनी ह्या साधनाचा शोध नुकताच लावला असून तसल्या तऱ्हेचे यंत्र पृथ्वीवर एकच आहे व ते जर्मनींत. तेव्हा येथे असें अद्वितीय यंत्र आणून बसविणारे व चालविणारे जर्मनच आहेत. आपल्याकडे मद्रासी लोकांनी जमाखर्चाच्या कामाचा जसा कांही मक्ता मिळविलेला दिसतो, तसाच सर्व जगतांत शास्त्रीय प्रगतीचे अग्रेसरत्व शार्मण्यदेशीयांना परमेश्वराने दिलेले आहे. या यंत्राच्या एका भागावर बर्फाचा जाडा थर असतो, तर दुसरे बाजूस जळजळीत व उष्ण वारा सोडणारे पातळ द्रव्य असते. घासलेट तेल या पद्धतीने अत्यंत थोड्या खर्चाने धुऊन निघते. या यंत्राचा विस्तार अतिशय मोठा असून गंधकाचा उपयोग यांत केला जातो; म्हणून ते पहाण्यास जाणाऱ्या मनुष्याच्या घशाला त्रास होऊन ठसके मात्र लागतात. तेथील धूर विषारी असल्यामुळे नवशिक्यास तेथे फार वेळ राहू देत नाहीत. जर्मनीने 'विषारी धूर ' या नांवाचा जो वायु गेल्या महायुद्धांत उपयोगात आणला होता त्यासारखाच हा धूर आहे असें म्हणतात.

 मु. ५

६५