पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/7

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.



मुसलमानी मुलखांतली


मुशाफरी


मुक्काम पहिला : पेशावर


( १ )


 अफगाणिस्तान हा आपल्या हिंदुस्थानपेक्षाही मागसलेला देश, धार्मिक समजुती व रूढींचा पगडा तेथे विशेष, राज्यपद्धति जुन्या चालीची, आधुनिक सुधारणेचा प्रवेश तेथे फार उशीरा झालेला. असें असतांही तेथील अमिरांनी आपल्या राष्ट्राची सर्वांगीण प्रगति मोठ्या झपाट्याने व्हावी असे प्रयत्न सुरू केले. तेव्हा आपणांसही आपल्या शेजारच्या राष्ट्राकडून कांही उपयुक्त गोष्टी शिकतां येतील त्या पहाव्या म्हणून तिकडे जाण्याचें ठरविलें.

 अशा हेतूने प्रेरित होऊन दुर्योधनाचा मातुल देश पहाण्यासाठी निघावयाचें ठरलें. पण त्यांत अडचणी काही कमी नव्हत्या. पहिली अडचण परवान्याची. कारण अफगाणिस्तान हा बोलूनचालून परकीय देश. सध्याच्या नाजुक वातावरणांत त्याला विशेष राजकीय महत्त्व