पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

अडचण असल्याने हॉलंडमधील सोललेली मटार येथे अगदी ताजी अशी मिळते आणि रोजच्या जेवणांतही लिव्हरपूलच्या मिठावाचून चालत नाहीं.
 सुरापानाची चंगळ--आचारस्वातंत्र्य दिले तर इंग्रज लोक काय करतील? आकंठ मदिरासेवनाविना त्यांना दुसरें कांहीच प्रिय नसल्याने 'बाटलीवाई'चे साम्राज्य माजेल हेच त्याचे उत्तर, इराकांत या प्रकाराला पुष्टिदायक असा पुरावा मिळतो. इंग्रजी सैन्याधिकारी युद्धकालीं व तदनंतर येथे आले; तेव्हा त्यांची मनसोक्त चैन चालावी म्हणून ठिकठिकाणी विलायती दारूचे गुत्ते उघडण्यांत आले; आणि हल्लीही बसऱ्यांत बाटलीबाईचींच दुकाने अधिक आढळतील ! सुरापानाचे वेड येथे इतकें बोकाळले आहे की, घराच्या मागे परसांतल्या बागेत झाडाभोवती आळे करण्यासाठी विटा किंवा दगडांचा उपयोग करतात तसा रिकाम्या दारूच्या बाटल्यांचा उपयोग केलेला या विभागांत दिसून येतो ! रिकाम्या बाटल्यांचा उपयोग काय करावा ही पंचाईत अजूनही इकडे सर्वत्र भासत आहे. जर्मन शास्त्रज्ञांनी विचारले पाहिजे !

–केसरी, ता. ५ मार्च, १९२९..






५८