पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/63

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भातुकलीतील भांडीं

असते. नुसते चहा किंवा कॉफी पिण्यासाठींच लोक येथे येतात असे नव्हे, तर नाना प्रकारचे टेबलावरील खेळ खेळणेंं, व्यापारधंद्याच्या किंवा रोजच्या व्यवहारांतील गुजगोष्टी बोलणेंं, राजकारणाची चर्चा करणेंं, चकाट्या पिटणेंं, खलबते करणेंं इत्यादि अनेकविध हेतूंनी प्रेरित होऊन सर्व प्रकारचे नागरिक तेथे येऊन बसतात. बसऱ्याचा शेअरबाजार अशा एक पानगृहांतच आहे ! पानगृहाची विशिष्ट खूण म्हणजे तेथे फोनोग्राफचें गाणे रात्रंदिवस चालू असावयाचें.

 चहाकॉफीचे व्यसन–चहा पिण्याचे कप, बशी व चमचा ही तिन्ही उपकरणीं अरबांसाठी म्हणून मुद्दाम बनविली जातात असे दिसते. बशी चिनीमातीची असून साधारणपणे तळहातापेक्षा मोठी नसते. कप हा काचेचा असतो. पण त्यांत फार तर तीन घोट चहाचा 'काढा' मावेल इतका तो मोठा वापरतात. आणि चमचा पितळेचा असून संध्येच्या पळीत मावेल इतके पाणी काढण्यास तसे चार चमचे घ्यावे लागतील या आकाराचा तो असतो. धिप्पाड आणि बळकट अशा अरबांना हे सर्व संच मुळीच शोभत नाहीत; पण ही त्यांची फार जुनी रीत आहे. कॉफीचा कप म्हणजे लहान मुलांच्या खेळांतलाच आहे असे वाटते. कॉफी नुसतीच–दुधाशिवाय–घ्यावयाची. चहाची व कॉफीची वेळ ठरलेली असते. पण रात्रंदिवस हे सत्र चालू असतेंंच ! खाणेंं थोडेंं आणि मचमच फार अशी आपल्याकडील म्हण इकडील प्रघातावरून पडली आहे की काय अशी शंका येतेंं, खाद्यपेयांच्या पदार्थांचा या प्रांतांत दुष्काळच आहे, म्हणून काय गमतीचा संगम होतो पहा. स्वित्झर्लंडमधील गोठलेलें दूध, फ्रान्समधील साखर, हिंदुस्थानांतील चहा, जपानांतून आलेली उपकरणीं आणि पदार्थसेवन करणारे अरबस्तानांतील रहिवासी. भाजीपाल्यांचीही

५७