पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/55

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
परजीवोपजीविजनांची ओरड

दिली. पोस्टखात्याचे उत्पन्न वाढविण्याची ही खाशी युक्ति आहे खरी, पण त्यासाठी ठेवावे लागणारे पोलिस किती पगार खातात कोण जाणे! असो.
 वाहने उजव्या बाजूनें हाकावीं --इराक आणि इराण हीं क–ण–चा भेद असलेली राष्ट्रें अगदी जवळ जवळ आहेत. म्हणून त्यांचा एकमेकांशी स्नेहसंबंध तर आहेच, पण इतरही आणखी काहीं बाबींचा प्रतिध्वनी एका देशांत उठला की, तो दुसऱ्या देशांतही ऐकूं येतो. उदाहरणार्थ, इराणांत सर्वत्र वाहनें उजव्या हाताने चालवावीत असा नियम आहे. फेब्रुआरीच्या १ तारखेपूर्वी इराकांत हिंदुस्थानप्रमाणेच डाव्या बाजूने गाडी हाकण्याचा निर्बंध होता. पण नुकताच तो इराणप्रमाणेच करण्यांत आला आहे. इराणांतून इराकांत किंवा इराकांतून इराणांत प्रत्यही मोटारींची जा-ये चालू असते. रस्त्यांतून वाहनें नेण्याचे परस्परविरोधी नियम असल्याने दोन्ही देशांत अनेक अपघात होऊं लागले आणि म्हणून सर्वत्र एकच निर्बंध असणे इष्ट वाटल्याने या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून इराकांत वाहनें उजव्या बाजूने जावीं असें जाहीर करण्यांत आलें.

  यांत अगदी साध्या सोईची व सुरक्षिततेची बाब असली तरी व्यापारैकदृष्टीने जगांतील लोकांना लुबाडणाऱ्या 'द्वीपस्थां'च्या नाकाला मिरची झोंबली. इंग्लंडांत बनलेल्या मोटारगाड्यांना अतःपर मुळीच मागणी येणार नाही अशी ओरड कित्येक दूरदृष्टीच्या व्यापाऱ्यांनी चालविली आहे. इंग्लंड आणि हिंदुस्थान हे दोन देश वगळल्यास जगांतील बहुतेक सुधारलेल्या राष्ट्रांत उजवे बाजूने वाहनें नेण्याची रीत असल्याने त्यांना सोईस्कर अशीच मोटारींची रचना केलेली असते. म्हणजे हाकणारा यांत्रिक डावे बाजूस बसतो. हिंदुस्थानांत डावे बाजूने

मु. ४
४९