पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/53

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

इराणांतील श्रीकृष्णमंदिर

शहरांत श्रीकृष्ण भगवंताचें देऊळ आहे. ही गोष्ट प्रथमतः अविश्वसनीय वाटेल, पण आबादानमधील एका भागांत---
  अंतकाले च मामेव स्मरन्मुक्त्वा कलेवरम् ।
  यः प्रयाति स मद्भावं याति नास्त्यत्र संशयः ॥
हा भगवद्गीतेंतील श्लोक शुद्ध संस्कृतमध्यें एकही चूक न करितां सोनेरी अक्षरांनीं लिहिलेला पाहून किती आनंद वाटला असेल याची कल्पना परदेशीं रहाणारांनीच करावी. अगोदर भगवद्गीता हा ग्रंथच असा की, स्वग्रामीं असतांनाही तो वाचला तर अपूर्व आनंद होऊन मन उल्हसित होतें. मग यावनी राज्यांत आपल्या धर्माचा अनुयायी देखील मिळणें दुष्प्राप्य असतां श्रीबालकृष्णाची मूर्ति, सर्व देवळाचा थाट आणि औचित्यपूर्ण असें वातावरण पाहून नाना विचार मनांत आले ! आबादान येथील घासलेट तेलाच्या कारखान्यांत काम करणारे दोनतीन हजार मजूर हिंदु आहेत आणि त्यांनीच स्वधर्माभिमानाने प्रेरित होऊन हें देवालय बांधलें आहे. नित्यशः तुलसीरामायण किंवा दुसऱ्या हिंदी कवनांचें प्रवचन येथे चालू असतें. प्रमुख सणही मोठ्या समारंभाने आणि भक्तिभावाने पार पाडले जातात.

 इराणी सरकारचा विचित्र निर्बध–-आबादानला जाऊन येण्यापुरताच इराणी प्रांताशी संबंध आला, तरी तेवढ्याच अल्पावधीत तिकडील मोंगलाईची थोडीशी कल्पना आली. पासपोर्टचे बाबतींतील निर्बंधाचें वर्णन मागील पत्रीं दिलेंच आहे. पण त्यावरही ताण करणाच्या नियंत्रणाचें हसूं आल्याशिवाय रहाणार नाही. इराणी राज्यांतून बाहेर जाणाच्या प्रवाशांची झडती घेण्यांत येऊन कांही पत्रव्यवहार त्याचेजवळ आहे की नाही हें कसोशीने पहातात. राजकीय उलाढालींना भिऊन किंवा त्यांना आळा घालण्यासाठी ही तपासणी

४७