पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/52

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

'तिलक श्री बालगंगाधरा 'ला असून रोजचे एक स्तोत्रच त्यांनी रचून ठेवलें आहे. प्रतिदिवशीं प्रात:काळीं त्याचें पठण होतें !
 इराणांत मराठी भाषा-—मंडनमिश्राच्या दारांत असलेल्या शुकसारिकांचाही आपसांत वेदान्तांतील गहन तत्त्वांचा वाद चालत असे; आणि त्याच्या घरांतील चाकरमाणसेंही अशा प्रकारचा विवाद करीत असत असें सांगण्यांत येतें. मतितार्थ हा की, मंडनमिश्राच्या घरांत सदैव वेदान्ताचा अभ्यास व चर्चा चालत असल्याने आजूबाजूच्या मंडळीवर व बोलक्या पक्ष्यांवरही त्याचा परिणाम दिसून येई. या दंतकथेत कांही सत्य असो वा नसो, एक इराणी मुलगा ' धन्य शिवाजी तो रणगाजी धन्यचि तानाजी ' हा पोवाड्याचा चरण म्हणत चाललेला पाहून तो खास कोणा तरी महाराष्ट्रीयांच्या सहवासांत आहे असें वाटलें आणि त्याच्या बरोबर जाऊन आबादान येथील मराठी भाषाभाषींचा पत्ता लागला ही गोष्ट स्वानुभवाची आहे. वास्तविक इराणी जात म्हणजे 'अर्बुद' असे इतिहासावरून कळतें. त्यांची भाषा आपल्या मराठीपेक्षा अगदी निराळी. त्यांच्या संस्कृतीशी आपली संस्कृति मिळणारी नव्हे. असें असतां केवळ उदरभरणार्थ राहिलेल्या या इराणी मुलास मराठी चांगलें बोलतां येऊं लागलें, इतकेंच नव्हे तर 'धन्य शिवाजी,' 'आनंदाचा कंद,' हीं मुलांची गाणींही मोठ्या आवडीने तो गाऊं लागला ! महाराष्ट्रीयांचे आबादानमधील घर शोधून काढण्याची खूण हीच की, त्यांच्या घरांतील काम करणारी इराणी मुलें मराठी गाणीं गात असतात !

 हिंदुस्थानबाहेर हिंदु देवालय–-स्वधर्मरक्षणार्थ इराण सोडून हिंदुस्थानांत आश्रयासाठी आलेल्या पार्शी लोकांचा इतिहास सर्वविख्यात आहेच. त्याच इराणांत मुसलमानी अंमलाच्या एका मोठ्या

४६