पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/33

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बंदुकांचा गांवठी कारखाना

हें आश्चर्य करण्यासारखें नाही असें कोण म्हणेल? आधुनिक सुधारणेचा थोडासा गंध या स्वतंत्र रानटी लोकांना लागलेला असेल तो या शस्त्रांचा आणि ती तयार करण्यासाठी लागणाऱ्या साध्या यंत्रांचाच! अगदी साधीं यंत्रें वापरूनही इंजिनच्या सहाय्याशिवाय उत्तम तऱ्हेचीं शस्त्रें तयार करता येतात, हें या आफ्रिदी लोकांनी जगाच्या निदर्शनास आणलें आहे! सर्वच काम माणसांकरवी चालत असल्याने अर्थातच आठ दिवसांत एक बंदूक (रायफल) तयार होते व सुमारें ऐशीं नव्वद रुपयांस ती त्या कारखानदाराला पडते. याच बंदुकीची विक्रीची किंमत सुमारे दोनशे तीनशें रुपये असते. म्हणजे बंदुकांना भारोभार रुपये मिळतात असें म्हणतां येतें.
 हा बंदुकांचा कारखाना भर रस्त्यावर आहे; आणि असे किती तरी कारखाने या स्वतंत्र मुलखांत आहेत. बंदुकांना अतिशय मागणी असल्याने दिवसभर त्यांचें काम चालू असतें. लांकडी, लोखंडी हाताचें किंवा यंत्राचे काम करणारे सर्व कारागीर पठाणच. देखरेखीसाठीही वेगळा ‘तज्ज्ञ' असा कोणी नाही ! सर्वच स्वतंत्र आणि सर्वच मालक. असा प्रकार असल्याने कारखाना फारच उत्तम व्यवस्थेने चालतो. अशा मुलखांतून येणाऱ्या दरवडेखोरांची भीति साहजिकच असावयाची.

 नाताळाचा सणः–अफगाणिस्तानचा रस्ता बंद असल्याने इकडील व्यापाऱ्यांचें फारच नुकसान झालें आहे. तशीच तिकडील लोकांची बरीच गैरसोय झाली असली पाहिजे! सुमारे दीड महिना झाला, मालाची जा-ये सर्व थांबली आहे. कालच 'बडा दिन'( नाताळ ) झाला. त्यासाठी लागणारी फळें व सुका मेवा काबूलहून आला नाही, म्हणून होता तोच माल जरा तेजीने विकला गेला. काबूलला तर नाताळांतील मेजवानीसाठी युरोपियनांना डब्यांतल्या

२७