पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/28

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

कोणावरही सोडण्यास हातीं कोणी तरी असावें अशी स्वार्थी मुत्सद्देगिरीची भावना नसेल कशी? या सर्वांच्या जोरावर हिंदुस्थान सरकार पुरोगामी धोरणानेच वागत आहे. यामुळे प्रजेवर कराचा बोजा पुष्कळ पडतो हें तर खरेंच. पण हल्ली चालू आहे असे अफगाणिस्तानातील बंड जरी झाले तरी बंडखोरांना कोणा तरी मोठ्या सरकारचें साह्य आहे, या संशयी वृत्तीने हिंदुस्थानकडे इतर राष्ट्रें पाहूं लागतात!

–केसरी, १ जानेवारी, १९२९.


( ४ )

 घोडा निकामी का झाला ? भाकरी का करपली ? विड्याची पानें कशाने कुजलीं? या तिन्ही प्रश्नांस 'न फिरविल्याने' असे एकच उत्तर लागू पडतें. तीच गोष्ट विमानांचीही दिसते. कारण येथे रोज सकाळी सूर्योदयाबरोबर निदान दोन विमानें तरी आकाशांत गंभीर ध्वनि करीत संचरतांना दिसतात. सध्याच्या अफगाण परिस्थतीमुळे प्रातःकालीन टेहळणीस प्रारंभ होतो, अशांतला मुळीच प्रकार नाही. कारण 'हवाई जहाज' येथील जनतेच्या इतकें आंगवळणी पडले आहे की, डोक्यावरून कितीही फेऱ्या झाल्या तरी तिकडे त्यांना पहावेसे वाटत नाही. उलट पेशावरांत आलेला परकी मनुष्य ओळखण्याची खूण म्हणजे तो आकाशांतील विमानाकडे मान वर करून पहात असतो हीच समजतात. सुभाषितकारांना 'अतिपरिचयादवज्ञा' कशी होते हें दाखविण्यास आणखी एक ताजें उदाहरण मिळालें !

 विमानांची फेरी--या आकाशयानांचा उपयोग नुकताच फार महत्त्वाचे कामीं झाला. काबुलशी दळणवळण थांबून बरेच दिवस झाले. तेथील खुशालीची खबर आणण्यासाठी येथून विमान गेल्याचें

२२