पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/22

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

महंमदानुयायी असें म्हणवितात आणि त्यांची मुल्लांवर (धर्मगुरूंवर) अलोट श्रद्धा असते. ते सांगतील तसें आचरण करण्यास हे रानटी लोक एका पायावर तयार असतात. त्यांची मान वाकते ती या धर्माध्यक्षांपुढेच. अस्तु.
  पहिल्या विभागांत ब्रिटिश लोकांनी आपलें वर्चस्व मोठ्या युक्तीने व खर्चाने स्थापन केलें आहे. तेथील मुख्यांना न दुखवितां, त्यांच्या वंशपरंपरा चालत आलेल्या वतनांना हात न लावतां, त्यांना मोठेपणा देऊन त्यांना आपलेसें करून घेतलें आहे. त्यांच्याकडून विशेषसा त्रास होत नाही. दुस-या विभागांत आफ्रिदी लोकांचें विशेष प्राबल्य. तसेंच, पेशावर ते काबूलचा रस्ता याच विभागांतून गेलेला आणि स्वतंत्र मुलखाचा अगदी अरुंद भाग या विभागांतच आहे म्हणन येथे संरक्षण जास्त लागतें. तिराह डोंगराची रांग या दुसऱ्या विभागांत असल्याने रानटी लोकांना लपूनछपून लुटालूट करण्यास पुष्कळच अवसर मिळतो. तिराहचे राजेसाहेब म्हणून एका स्वतंत्र भागांतील टोळीचे नायक आहेत. हेही सर्व लोक ब्रिटिशांशी सख्यत्वाने वागतात. कधी कोणाशी मिळून मिसळून न वागणारे रानटी पुंड इतके ‘नरम' कसे आले याचे कित्येकांना कोडें पडतें. पण त्यांतील मुख्य गोम ‘द्रव्येण सर्वे वशाः' ही आहे.

 इ. स. १९२५ साली उघडलेली खैबर रेल्वे याच भागांत आहे. ब्रिटिशांची हद्द जमरूद (जमदग्निपुरी?) येथे संपतें. हें गाव पेशावरपासून सात मैलांवर आहे. परंतु जमरूदच्या पुढे वीसपंचवीस मैल ही रेल्वेलाइन लंडीखान्यापर्यंत गेली आहे. लंडीखान्यापाशी ब्रिटिश व अफगाण सरहद्दी एकत्र येतात. जमरूद आणि लंडीखाना यांच्या दरम्यानचा भाग स्वतंत्र मुलखापैकी असतां त्या त्या रानटी लोकांशी

१६