पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/20

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

आणि कोहाट हे दोन लष्करी जिल्हे असून तेथे फौजही पुष्कळ ठेविली आहे.
 हिंदुस्थानच्या भौगोलिक रचनेमुळें थेट उत्तर सीमा रक्षण करण्यास विशेषसा त्रास किंवा खर्च पडत नाही. समुद्रकिनाऱ्यामुळेही त्या सीमाप्रांतावर लष्करी ठाणीं ठेवण्याची दगदग बरीच कमी झाली आहे. पण या सर्वांचें उट्टें वायव्यसरहद्दीचा बंदोबस्त करण्यांत निघतें.अफगाणिस्तानला दिवसानुदिवस राजकीय महत्त्व येत चाललें हें एक कारण तर खरेंच, परंतु अफगाण सरहद्द व हिंदुस्थानची सरहद्द यांमध्ये पुष्कळसा टापू कांही रानटी लोकांच्या ताब्यांत आहे हेच दुसरे महत्त्वाचे कारण वायव्यसीमाप्रांतावर लष्करी खर्च वरचेवर वाढविण्याचें आहे.

 शेतकन्यांमध्ये शेताची हद्द कोठे संपते किंवा दुसऱ्याचे शेत कोठून सुरू होतें याविषयी नेहमी तंटे चालतात. मग मोठमोठ्या राष्ट्रांच्या सीमेबद्दल रणें माजल्यास नवल कसचें? अफगाणिस्तानच्या सीमा ठरविण्याकरितां बरीच कमिशनें बसली होतीं. परंतु आपणांस इतर सीमा पहावयाच्या नसून आमच्या वायव्यसीमेविषयींच लिहावयाचें आहे. इ. स. १८९३ मध्ये ‘ड्यूरांड' नांवाच्या एका अधिकाऱ्याने अफगाण हद्दीची निश्चित आखणी करून हिंदुस्थानकडील सीमा ठरविली. तिला ड्यूरांड सीमा (ड्युरांड लाइन) असेंच म्हणतात आणि ती अफगाणिस्तानला लागून आहे. वास्तविक पहातां अफगाणिस्तानची हद्द संपते तेथूनच ब्रिटिश हिंदुस्थानच्या सीमाप्रांतास प्रारंभ व्हावयास पाहिजे होता. परंतु तसेंं नाही. म्हणूनच वायव्यसीमाप्रांताला विशेषेंकरून महत्त्व आलें आहे. ब्रिटिशांचा मुलूख व अफगाणांची ड्यूरांड सरहद्द यांमध्ये पुष्कळ रानटी लोक राहतात.

१४