पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/184

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

फार आनंद झाला,"असें त्याने सफाईने बोलून दाखविलें. मलाही अत्यानंद झाला. कुशल प्रश्न विचारल्यानंतर तो मुलगा हिंदुस्थानांत कोठे होता याची चौकशी केली. लाहोरच्या मुसलमान बॅरिस्टरांचा तो पुत्र असून त्याचें आजोळ इराणांत हमादान येथे होते. त्याची आई इराणी, म्हणून तो शिक्षणासाठी तेथे राहिला होता. लाहोरच्या प्रेक्षणीय स्थळांच्या आठवणी आम्ही एकमेकांस सांगितल्या. "पुनः हिंदुस्थानांत येईन तेव्हा अवश्य लाहोरला या," असें तो म्हणाला."मुंबईला आल्यावाचून राहू नकोस," हें मी त्याला बजावून सांगितलें. नंतर त्याने एकच प्रश्न विचारूं का?" म्हणून म्हटलें. "हो, अवश्य," असें सांगतांच तो म्हणाला, “हिंदुस्थानांतले लोक इतके शेळपट का हो असतात? बरोबर सुरा, दंडा किंवा तरवार ते का नाही बाळगीत? कोणीही त्यांना मारलें किंवा बोललें तर ते आपले मुकाट्याने सर्व सोसतात. मला हिंदुस्थान फार आवडतें; पण तेथील लोकांची ही नेभळट वृत्ति मात्र पहावत नाही. त्यांनी जवळ एखादा सुरा ठेवला तर त्यांना कोण त्रास देणार आहे? येथे पहा आम्ही कसें करतो तें?"
 लहान मुलांची टीका निर्भीड, सडेतोड आणि वास्तविक असते म्हणतात ती अशी. बोला याला कांही उत्तर आहे का ?

  *
*


  इराणी लोकांच्या संगतींत असतांना गोष्टी निघावयाच्या त्या हिंदुस्थानसंबंधीच्या. "तुमच्या देशांत हें आहे का?" "तमक्याला तुम्ही काय म्हणतां?" अशा तऱ्हेचे प्रश्न फार झाले नाहीत, तरी हिंदुस्थान कसे आहे याच्या त्यांनी आपापल्या परीने कांही खुणा सांगितल्या. मात्र सर्वांचे एकमत असें की, "हिंदुस्तान खैलेऽखैलेऽखूब