पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/163

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

बलुचिस्तानचे धृतराष्ट्र

थोडीशी चुणूक रौलेट साहेबांच्या अध्यक्षतेखालीं प्रसिद्ध झालेल्या 'सेडीशन कमिटी'च्या वृत्तांताच्या प्रथम भागांत आढळेल.
 दुजदाब येथील ख्रिस्ती मिशनऱ्याकडे उपाहारास गेलों असतां प्रवासासंबंधी बऱ्याच गोष्टी निघाल्या. निरोप घेतांना मिशनरीसाहेबांनी काढलेले उद्गार पहाः-
 तुम्ही उच्चवर्णीय हिंदु - धर्मगुरु- असाल असें मला मुळीच वाटलें नाही. कारण, तुम्ही आमचे बरोबर पेयपान व उपाहार केला होता. आता तुम्हांला कोणत्याही हिंदु देवालयांत जातां येणार नाही किंवा तुमच्या घरच्या मंडळींत मिसळतां येणार नाही याबद्दल मला फार वाईट वाटतें! तुम्हाला वाळीत टाकतील ना ?
 हें ऐकून प्रथमतः मला हसूच आले. 'चहाच्या कपा' विषयी वादळ माजण्याचे दिवस पार निघून गेले असतां एका इंग्रज समाजसेवकाने अशी शंका प्रदर्शित करावी हे पाहून गंमतच वाटली. त्या शंकेचे निराकरण करतांच साहेबबहाद्दरांची हिंदुधर्माबद्दलची जिज्ञासा वाढली आणि झपाट्याने सुधारत असलेल्या हिंदुधर्माची माहिती त्यांनी कुतुहलपूर्वक विचारली.

–केसरी, तारीख ११ व १८ जून, १९२९.


(१९)

 बलुचिस्तानचे ब्रिटिश बलुचिस्तान व स्वतंत्र बलुचिस्तान असे दोन भाग असून ब्रिटिशांची राजधानी क्वेट्टा येथे आहे व 'कलात' ही स्वतंत्र बलुच्यांची राजनगरी आहे. मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा अर्थ अगदी निराळा आहे, हें सांगितले पाहिजे. कलाताधिपतीला 'खान' म्हणतात. प्रस्तुतचे खान 'धृतराष्ट्र' पदवीला

१५७