पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/161

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

स्टेशनमास्तरवर कठीण प्रसंग

देत ! बलुची शिपाई कडव्या जातीचे; पण त्यांनाही या इराणी जनावरां'पुढे हात टेकावे लागले ! कांही बलुच्यांवर अगदी कठीण प्रसंग आला असतां त्यांची सोडवणूक करण्याची पाळी प्रस्तुत लेखकावर आली. तेव्हा ही माणसें नव्हत, ती शुद्ध जनावरें होत असे उद्गार त्या बलुच्यांनी काढले. एका स्टेशनमा स्तरवरही तशी विचित्र वेळ आली असतां, तो थोडक्यांत बचावला ! इराणी अज्ञानी व दुराग्रही असले तरी त्यांनी अगदी योग्य आचरण रेल्वेवर केले. रेल्वेची व त्यांची दृष्टादृष्ट प्रथमच झालेली; पण तितक्या अल्पावधीत त्यांनी डब्यांत असलेल्या पाट्या वाचन ठराविक माणसांपेक्षा एकही अधिक उतारूस आंत घेतले नाही. स्टेशनमास्तरवर आलेला प्रसंग म्हणून म्हटलें तो याच वेळचा. अधिक उतारू डब्यांत कोंबण्याच्या प्रयत्नास यात्रेकरूंनी विरोध केला. स्टेशनाधिकारी आपण बचावलों याच आनंदांत गर्क झाला. या साडेचारशे मैलांत एकही उतारू त्या गाडीत चढला नाही हे आश्चर्य नव्हे का? आमचे यात्रेकरू मात्र ठराविक संख्येपेक्षा दुप्पट उतारू डब्यांत असले तरी चकार शब्दही काढीत नाहीत किंवा काहीच व्यवस्था करण्याचे मनांत आणीत नाहीत. इराणी अडाणी यात्रेकरूंपासून आमच्यापैकी सुशिक्षित प्रवासी कांही धडा घेतील तर रेल्वेला व्यवस्था करणे क्रमप्राप्त होईल.

 दुजदाब ते केट्टा हा तीस तासांचा प्रवास पुनः अगदी रूक्ष वाळवंटांतून झाला! वेड्याजवळ ऐशी मैल येतांच घाट लागला आणि हिरवीगार झाडे दिसू लागली. खुद्द केट्टा शहर तर उद्यानमय आहे. त्यामुळे मनाला इतकी प्रसन्नता आली की, हे शहर सोडून जाऊ नये असें वाटू लागलें.

१५५