पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/154

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

त्यांस हात लावूं देत नाहीत. पण इराणांतल्या रोटीस वाटेल त्याने हात लावावा. हात कसलाही असो, कोणी बोलावयाचे नाही. पण हे सर्व प्रकार दृष्टीसमोर होत असूनही डोळ्यांवर कातडें ओढून पुढे येईल त्या अन्नावर हात मारावा लागला.
 "विश्वामित्रः श्वमांसं श्वपच इव पुरा भक्षयन्यनिमित्तम् ।”
त्याच कारणासाठी स्वच्छास्वच्छतेचा, आरोग्याचा आणि पथ्यापथ्याचा विचार पार हाकून द्यावा लागला! विश्वामित्रासारखा कमालीचा प्रसंग आला नाही ही परमेश्वराची कृपाच म्हणावयाची.

  सुर्खा, सिमनान, दमगाव, शारूद, सब्झेवार, निशापूर या गावांवरून मशहदला आलों. निशापूर येथे पाश्चात्यांचा आवडता इराणी कवि उमर खय्याम याची कबर आहे आणि परकीय प्रवासी तेथे जाऊन दर्शन घेणें अगदी महत्त्वाचे समजतात. खुद्द इराणी जनतेस उमरची फारशी ओळख नाही असें म्हटल्यास वस्तुस्थितीचा विपर्यास होणार नाहीं. फिर्दोसी किंवा सादी मात्र प्रत्येकास ठाऊक आहे. खय्याम हा युरोपियन राष्ट्रांत इतका लोकप्रिय झाला याची कारणें दोन आहेत. एक तो मदिरादेवीचा नि:सीम उपासक होता; इतका की, 'तळिराम' देखील त्यापुढे फिक्का पडेल! दुसरें कारण असें की, तो पारमार्थिक सुखाविषयी बेफिकीर असून इहलोकीच्या वास्तव्यापलीकडे त्याच्या कल्पनेची मजल मुळीच जात नसे! चार्वाकाच्याही पलीकडे तो गेला आहे असे म्हणता येईल. चार्वाक फक्त 'ऋणं कृत्वा घृतं पिबेत्' असे सांगतो, तर खय्यामची शिकवण 'ऋणं कृत्वा सुरां पिबेत' अशा प्रकारची आहे. नुलत्या मदिरेपर्यंतच त्याची विचारपरंपरा आहे असें नाही. 'मदिरा, काव्याचे पुस्तक, रोटी आणि तूं मजजवळ असलीस तर जंगलांतही स्वर्ग अवतरेल,' असे तो मदिराक्षीस उद्देशून

१४८