पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/148

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.मुक्काम सहावा :क्वेट्टा
( १८ )

  इराणांतून बलुचिस्तानांत विमानांतून येणें सुखाचें होतें. तरी सदर प्रदेशाची नीट ओळख करून घेण्यासाठी मी मोटारींतूनच यावयास निघालों. तेहरानहून सकाळी निघावयाचे असें ठरलें होतें, तरी सायंकाळीं सूर्यास्ताचे सुमारास मोटार हलली! तेहरानच्या सीमेबाहेर तर दिवे लागल्यावरच पडलों. बाकी ही पद्धत नेहमीचीच असल्याचे समजले. इतकेच नव्हे तर त्याच दिवशी निघाल्यावद्दल मोटारहाक्याचे आभार माना असेही कोणी म्हणाले! बारा उतारूसाठी किंवा चाळीस मण बोजासाठी बनविलेल्या अमेरिकन यंत्रयानांत [मोटार] सुमारे पंचवीस तीस मण सामान आणि सोळा उतारू 'कोंबले' होते!

  बरें, रस्ता तरी चांगला असावा अशी अपेक्षा करावी तर तेंही मूर्खपणाचेंच! पुढे गेलेल्या मोटारच्या खुणेवरून 'पावलांवर पाऊल टाकून ' जावयाचें हा सारखा क्रम ठेवावा लागला. तेहरान–मशहद हें अंतर ५६० मैलांचे आहे. दिवसा यंत्रयान मार्ग आक्रमण करी व रात्रौ सर्व प्रवासी निद्राराधन करीत. अंधारांत मार्गही दिसत नसे आणि दिवसभराच्या शिणाने सर्वच जण थकून भागून जात. एकंदर पांच रात्री या प्रवासास लागल्या व सहाव्या मध्यरात्री उद्दिष्ट गावी आम्ही पोचलों. मोटारीच्या भानगडीही मधून मधून होत असतात. त्यासाठीही कांही अवधि खर्च होत असे. रस्त्याची परिस्थिति वर सांगितलीच आहे. त्यांत यांत्रिकांच्या अकलेची भर पडावयाची राहिली. म्हणजे प्रवासाला निघण्यापूर्वी यंत्रयानाची

१४२