पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/146

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

ही एक महत्त्वाकांक्षा होती. आणि ती पुरी करण्यासाठी त्याने इराणी शहाशीं संबंध लावण्याकरितां वकील पाठविले होते. त्यामुळे किंवा फ्रेंच मिशनऱ्यांच्या प्रयत्नांमुळे बोनापार्टचें नांव सर्वतोमुखी आहे. इतकेंच नव्हे, तर नेपोलियनच्या आयुष्यक्रमांतील महत्त्वाचे प्रसंग दाखविणारीं चित्रें सर्वत्र पसरलेलीं आहेत. देवादिकांची चित्रे विकतात तशी इकडे इराणांत नेपोलियनचींच चित्रे फार आढळतात ! इराणांतील तरुण पिढी बहुधा फ्रान्समध्येच शिकलेली असून इंग्रजीपेक्षा फ्रेंच भाषेशीच त्यांचा निकट संबंध असतो.
  फार्सी भाषा संस्कृतशीं बरीच जुळते. अरबीपेक्षा ती बोलण्यास आणि समजण्यास सोपी आहे. कानडी प्रांतांत हेल काढून बोलण्याची रीत आहे, तशीच इराणांत सर्वत्र आढळेल. तेहरानमध्येच नव्हे, तर इराणांत सर्वत्र फार्सी, तुर्की, रूसी किंवा फ्रेंच यांपैकी तीन भाषा जाणणारे लोक दिसून येतात. अरबीही कित्येक बोलूं शकतात. पण निदान तीन भाषा बोलतां येणारे लोक आपल्याकडे किती आहेत? साधा अशिक्षित म्हणजे लिहितांवाचतां न येणारा मनुष्य असला तरी तो तीन भाषा बोलूं शकतो हे पाहून आश्चर्य वाटते.

  घोड्यांच्या ट्रॅमगाड्या, मोटार बस आणि घोड्यांच्या बग्या हीं मुख्य वाहतुकीचीं साधनें तेहरानमध्ये आहेत. शहरातील रस्ते रुंद असून जागोजाग शहरसुधाराईसाठी चाललेली खटपट दृष्टीस पडते. डोंगराच्या पायथ्याला ही राजनगरी वसली असून रस्त्यांतून बर्फाच्छादित गिरिभाग दिसतो, इतकेंच नव्हे तर इराणांतील एल्बुर्झ पर्वतांतील अत्युच्च शिखर 'देमावांद ' हें १९,००० फूट उंचीचें असल्यानें तें तेहरानमधून दिसतें. आकाशांतील मेघमाला वरचेवर निरनिराळें स्वरूप धारण करीत असल्याकारणाने, कधी अत्यंत थंड वारे सुटून

१४०