पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/142

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

करणाच्या' सुरेचें प्राबल्य इराणांत साहजिकच अधिक आहे. वस्तुतः मद्यसेवन हे व्यसन न मानतां मद्य हें नेहमीच्या पेयांतील एक उच्च दर्जाचें द्रव्य असेंच मानलें जातें ! साधा 'द्राक्षरस' कोणीही घरीं करावा, त्याला कायद्याची बंदी नाही. दारू न घेणारा मनुष्य क्वचितच आढळेल. विद्यार्थीदेखील तिचें सेवन सर्वांदेखत करू शकतात. परदेशी मद्याचा प्रसार नाही असे नाही. मात्र तो श्रीमंतांत आहे एवढेंच!

 बालविवाह रूढ असलेला दिसत नाही हें खरें; पण एक विचित्र विवाहपद्धति इकडील लोकांत प्रचलित आहे. तिचे स्वरूप पाहून तिला ' विवाह' असें का म्हणावें हा प्रश्न पडतो. हे सर्व कृत्य अगदी धार्मिक, न्याय्य व नैतिक मानलें जातें ही विशेष मौज! 'जुजबी ' लग्ने म्हणून इस्लामानुयायी जनांची इराणांत जी रीत आहे, तिच्या सहाय्याने तीन महिने, चार महिने किंवा आवश्यक व इष्ट असेल तितकाच वेळपर्यंत एखाद्या स्त्रीशीं विवाहबद्ध रहातां येतें ! लग्न लावणारा मुल्ला ठराविक दक्षिणा घेतो आणि त्याच वेळी हा विवाह किती कालपर्यंत टिकणारा आहे याचा निर्णय विवाहेच्छु दांपत्याच्या संमतीने ठरवितो. त्या मुदतीनंतर या जोडप्याचें नातें तुटतें. त्यांना पुनः धर्माधिका-यापुढे किंवा न्यायासनापुढे काडी मोडण्यास जावें लागत नाही. यामुळे एका वर्षांत चार चार पांच पांच वेळां विवाहबद्ध होतां येतें, व एकाच वेळीं पुष्कळ पत्न्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी पडते. भावी अडचण टाळण्यासाठी दूरदृष्टीने ती तरतूद विवाहप्रसंगाने करून ठेवली जाते. परंतु ही पद्धति सर्वत्र प्रचलित असून तिजबद्दल कोणास कांही वाटतें असें दिसत नाही. बाह्यात्कारी टोपीची आणि कोटाची सक्तीने सुधारणा

१३६