पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/135

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

भोजनांतील सव्यसाची वीर

  खाद्य पदार्थात गव्हाची रोटी ही जास्त असून अंडीं विपुल प्रमाणांत वापरतात. तांदूळ, मांस, मासे हीं तर असावयाचीच. पण दही आणि ताक हीं इकडे इतकी प्रचारांत आहेत की, वातोदकांप्रमाणे [वातोदकें = सोडावॉटर वगैरे पेयें] ताक किंवा दहीं हीं कोठेही मिळू शकतात. दूध उपयोगात आणतात, पण तें शेळीचें, गाईचें, उंटिणीचें का गाढवीचें हें कळण्यास मार्ग नाही. निर्भेळ गोक्षीर क्वचितच मिळते. (इराणी भाषेत शीर-इ-गाव म्हणजे गाईचे दूध. 'इ' हा षष्ठीचा प्रत्यय, शीर = क्षीर, गाव= गौ, हे संस्कृतशी साम्य लक्षात ठेवण्यासारखे आहे.) कांही प्रसंगीं मानवी दुधाचेंही त्यांत मिश्रण असतें असें सांगण्यांत येतें आणि तें खरें मानण्यास बरींच कारणें आहेत. फळफळावळींत द्राक्षें, नारिंगें आणि डाळिंबे इकडे विशेष आहेत आणि तीं वर्षभर मिळूं शकतात. निसर्गाने ती राखण्यासाठी हिमवृष्टीचा लाभ या देशास आपोआपच करून दिला असल्याने 'मधांत' फळें घालण्याची आवश्यकता वाटत नाही. मधही विपुल असून खाण्यासाठी त्याचा उपयोग मनस्वी केला जातो. लोणी देखील इकडे मिळतें, पण तें महाग असतें. पालेभाज्या, गाजरें, विलायती मुळे, कांदे, बटाटे. (भालाकारांचे आवडते) भोपळे इत्यादिकांची लागवड होणें सुलभ आहे. कारण पाणी सदैव खेळतें असतें. आम्रफलाची मात्र कल्पनाच इराणी प्रजेस आहे! औषधाला तर नाहीच, पण शाळेंत वस्तुपाठ देण्यासाठी आंब्याचें झाड चित्ररूपाने पाहूं म्हटलें तरीही मिळावयाचें नाही! पालेभाज्या कच्च्याच खाण्याचा प्रघात आहे. भोजनांत सर्वच वीर 'सव्यसाची' असावयाचे हें ठरलेलेंच.

  इकडे आल्यानंतर एक मोठा फरक दैनिक कार्यक्रमांत झाला असेल तर तो स्नानाचे नांव आन्हिकांतून काढून साप्ताहिकांत अथवा

मु. ९
१२९