पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/123

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

साम्राज्यवाद्यांसमोर साम्राज्यविध्वंसक

असते तर त्यांना भूषणें म्हणतां आलें असते. पण दागिने घालणारांस हसणारांनी मिश्र धातूंचे तुकडे, रंगीबेरंगी कापडांच्या चिंध्यांनी आपल्या छातीवर मोठ्या फुशारकीने लावून मिरवावें यापेक्षा विचित्र प्रकार दुसरा असेल काय ? त्या मानाने अमेरिकन आणि रशियन प्रतिनिधी अगदी साधे होते. त्यांच्या उंच पण काळ्या चकाकणाऱ्या टोप्याच चटकन् डोळ्यांत भरत. पण साम्राज्यवाद्यांचा पोषाक गमतीचा होता हें मात्र खरें.

 यापेक्षाही दुसरी मौज वाटत असेल तर ती परराष्ट्रीय मंत्री एकत्र कसे येतात तें पहाण्याचीच. तेहरानमध्ये आशियांतील देशांचे, युरोपियन राष्ट्रांचे व अमेरिकेचेही वकील आहेत. जणू काय प्रत्येक देशांतील लोकांच्या नमुन्याचें इराणी राजनगरीत प्रदर्शनच मांडलें आहे असें वाटतें. या वकिलातींचीं आवारें त्या त्या वकिलातीच्या महत्त्वाच्या मानाने विस्तृत आहेत. त्यांच्या रचनेवरूनही त्यांचे आपसांतील स्नेहसंबंध सहज लक्षांत येतील. विश्वगोलावर आपले पंख पसरणाच्या जर्मन गरुडाच्या सन्निध तुर्कांचें निवासस्थान आहे. महायुद्धाचे प्रसंगीं तुर्क शिपायी जर्मन योद्धयांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते, तद्वत् तेहरानमधील या दोस्त राष्ट्रांच्या वकिलातींच्या आवारांच्या भिती एकमेकांस लागून आहेत. एकमेकाला खाऊं की गिळूं या भावनेने जगांत वावरणाच्या, साम्राज्यवादी इंग्रज व साम्राज्यविध्वंसक रशियन यांच्या ‘सिफारती’ (सिफारत=वकिलात ) इतक्या जवळजवळ आहेत की, त्यांच्या मधून फक्त एकच रस्ता जातो. मात्र छत्तिसाच्या आंकड्याप्रमाणे किंवा फार्सी अठ्याहत्तरच्या आंकड्याप्रमाणे त्यांची प्रवेशद्वारें विरुद्ध दिशेला आहेत ! पण इंग्रजी वकिलातीत उभें राहिलें असतां मागील बाजूच्या रशियन वकिलातीवर फडकणारें तांबडें निशाण

११७