पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/118

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

(१६)

 'सलाम' या तीन अक्षरी शब्दांत कांही विशेष अर्थ असेंल असें कोणास वाटणार नाही. परंतु आज येथे पाहिलेल्या 'सलाम' समारंभावरून त्या शब्दाची यथार्थ व्याप्ति कळून आली. रस्त्यांतून जातांनाही सलाम करणारे लोक पुष्कळ भेटतात. पण अतःपर 'सलाम' हा शब्द नुसता उच्चारला तरी, जगांतील परस्परविरोधी राष्ट्रांचे एकत्र जमलेले प्रतिनिधी, चित्रविचित्र वेषभूषित सैनिक, त्यांचे नायक, इराणांतील निवडक प्रजाजन, राजसभेचें मंत्रिमंडळ, स्वबलावर राज्यपद प्राप्त करून घेणारा रेझा शहा पेहेलवी, तो गुलिस्तान राजवाडा, तें विस्तृत उद्यान, तेथील कर्णमधुर आणि वीरवृत्तिपरिपोषक वाद्यवादन ....इत्यादि सर्व गोष्टींचा चित्रपट डोळ्यांपुढे उभा राहील. 'केसरी'च्या प्रवासी प्रतिनिधीला हा समारंभ पहाण्याची संधि मिळाली, त्याचें शाब्दिक चित्र खाली देत आहे.

 आपल्याकडे ध्वजारोपणदिनाला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला नूतन वर्षारंभ होतो. व्यापाऱ्यांचा कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नवीन वर्षाचा आरंभ असतो. तसाच इराणी प्रजेचा २१ मार्च रोजीं नव्या वर्षाचा प्रथम दिवस असतो. याला 'नव-रोज' (नवा दिवस) असें म्हणतात. पार्शी लोकांचा हाच वर्षारंभ असल्याने हिंदुस्थानातील पार्शी वस्तीच्या शहरी या दिवशी सुट्टी असते. ख्रिस्तानुयायी देशांत नाताळानिमित्त आठवडाभर सुट्टी असून नूतन वर्षाचा समारंभ मोठ्या थाटाने सर्वत्र साजरा केला जातो. तसाच प्रकार इराणांत आहे. नवरोजपूर्वी चार दिवस व नंतर चार दिवस अशी विद्यार्थ्यांची नऊ-दहा दिवस अनध्यायाची चंगळ चालते. मनुष्यस्वभाव जगाच्या पाठीवर चोहोकडे एकच असावयाचा. त्याची उत्सवप्रियता ही सदासर्वदा

११२