पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/100

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.




मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

सवय नाही म्हणूनच बर्फमय प्रदेशांत प्रवास करावयाचा. फार्सी भाषा अवगत नाही हें खरें, पण याच विचाराने जर चालावयाचें असेल तर, प्रथमतः त्या देशाची भाषा शिकून मग हिंडावे असा कार्यक्रम आखल्यास हिंदुस्थानांतील अर्धा भाग पहाण्यास जन्म पुरणार नाही ! जेथे माणसें रहातात तेथे दुसऱ्या कोणत्याही माणसाला जातां येते, रहातां येतें याच विचाराने मी प्रवास करीत असल्याचे सांगून त्यांची चिंता दूर करण्यासाठी त्यांना दर आठवड्यास पत्र लिहिण्याचें आश्वासन देऊन मी निघालों.
 बर्फामुळे मोटारगाड्या दोन ठिकाणीं अडल्या. रस्त्याच्या आजूबाजूंस वस्ती फ़ारच कमी असल्याने एक रात्रभर इराणी कामकऱ्यांच्या झोपडींत रहावें लागलें. त्यांचें आदरातिथ्य पहावयास मिळालें. सहभोजनाचाच काय, पण एका ताटांत भोजन करण्याचा प्रसंग आला. इत्यादि अनुभव कमी महत्त्वाचे आहेत की काय ? कोणत्याही कार्यांत विघ्नें आलीं नाहीत, संकटाचें मीठ त्यांत नसलें, तर मग मौज तीकाय राहिली ?

–केसरी, ता.१६ एप्रिल, १९२९.


(१४ )

  स्वदेशप्रीति, मातृभाषा आणि आपलेपणा यांचीं रोपटीं परदेशच्या हवापाण्याने फोफावून कशीं जोमदार होतात तें बगदादला येतांच अनुभवण्यास मिळालें. मेसापोटेमियाच्या राजनगरीेशीं मराठ्यांचा संबंध गेल्या महायुद्धापासून सुरू झाला, तो अद्यापपर्यंत कायम आहे. कदाचित् कलकत्ता नगरींत ' मराठा खंदक ' ( मराठा डिच ) म्हणून जसें -मराठी मुलुखगिरीचें स्मारक शेकड़ों वर्षे राहिलें आहे, तसेंच बगदाद

९४