हे पान प्रमाणित केलेले आहे.
त्यांना कोणी बंदी घातली होती? त्यांना प्रोत्साहन देणारे पण तिथं बरेच होते. विजय तेंडुलकर वगैरे. शिरीष पै - तिथं होती. सगळ्यांनी कौतुक केलं त्यांचं तिकडे.
नोव्हेंबर ६८ मध्ये इंडियन सेक्युलर सोसायटीतर्फे 'मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया' हे दलवाईंचं पुस्तक प्रसिद्ध झालं. ते खूप गाजलं. 'इंधन' कादंबरी हे मौज प्रकाशनचं श्री. पु. भागवत यांनी काढलं होतं. ते दलवाईंचे मित्र होते. या कादंबरीला महाराष्ट्राचं पहिलं बक्षीस मिळालं आहे. 'लाट' आणि इतर काही पुस्तकंसुद्धा प्रसिद्ध झाली आहेत.
मी भरून पावले आहे : ७७