पान:मी भरून पावले आहे.pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

ह्यांची पँट टांगलेली असायची. सुट्टे पैसे त्यात असायचे. तर दोनदा मला म्हणाले, 'माझे सुट्टे पैसे कोण काढतं? मेहरू, तू काढते का?' मला माहिती होतं, यांच्याकडे काय असणार? यांच्या खिशात घालायला माझ्याच पाकिटामध्ये पैसे नसायचे. तर मी म्हटलं, 'मी नाही बा काढले आणि मला सवय पण नाही.' दोन दिवसांनंतर रुबीनाच्या कंपासबॉक्समध्ये मला सुट्टे पैसे सापडले. मी हिला पैसे दिलेले नाहीत, ह्यांनी तिला पैसे दिलेले नाहीत, तर हे पैसे आले कुठून? मग मला डाउट आला. मी म्हटलं, असं असं वाटतंय. त्याच्यानंतर त्यांनी तिला विचारलं, 'तुझ्या बॉक्समधे सुट्टे पैसे कुठून?" पहिल्यांदा हो-नाही, हो-नाही केलं. मग दम दिल्यानंतर सांगितलं, "बाबा, दोन दिवस तुमच्या पँटमधनं काढले." "का काढले?" "नाही. त्या मुली पैसे आणतात. खातात.” "मग तू आम्हांला का नाही सांगितलं? मम्माला सांगितलं? तुला काय कमी पडत होतं घरात खायला? म्हणाल ते आणून देतो का नाही? पैसे आम्ही देणार नाही. तुम्ही बाहेरचं खायचं नाही. तुम्हांला जे काही पाहिजे ते सांगा, तुम्हांला घरात आणून खायला देईन."
 त्यांना खूप राग आला. एक चापटी तिच्या कुल्ल्यावर दिली. आणि ते म्हणाले, "उद्या सकाळी मी तुझ्या शाळेमध्ये येणार. तुझ्या बाईंना सांगणार, हिने चोरी केलेली आहे. हिला बेंचवर उभी करा आणि सगळ्यांच्या समोर हिला शिक्षा करा. हे तुझ्यासाठी मी करणार आहे." एवढं ऐकलं आणि ती त्या धसक्याने खूप घाबरली. आणि मला पण वाटलं की अरे बापरे, हे जातील सकाळी उठून. तर रात्री मी समजूत घातली. “हे पहा, असा स्टँड आपण मुलांच्या बाबतीत घ्यायचा नाही." मग त्यांना वाईट वाटलं तिला मारल्याबद्दल. चार दिवस ते नीट जेवले नाहीत. आणि "मी, मेहरू, बाब्याला मारलं. मी, मेहरू, बाब्याला मारलं. हात माझा उचलला कसा? बाई, मी एक चापटी कधी माझ्या वडिलांच्याकडनं खाल्लेली नाही. त्या पोरीला मारण्यासारखं काय होतं? तिला दम दिला तरी ती ऐकण्यासारखी होती आणि मी तिला मारलं. हे मी चांगलं केलं नाही." असं म्हणत राहिले. मग तिने माफी मागितली. तिला शाळेमध्ये नेली. नंतर तिने कधी चोरीमारी केलेली नाही. पण ते म्हणाले, झालं ते बरोबर नव्हतं म्हणून.

  गावाला आम्ही गेलो नवीन नवीन, तर आमच्या त्या गावामध्ये तो ग्रामोफोन- तो ओल्ड फॅशन्ड भोंग्याचा - दलवाईंकडे होता. महंमद दलवाईंकडून तो आणला होता. मग तो घरात लावला की सगळा गाव लोटायचा बघायला. ती सैगलची गाणी. त्यांना पिक्चर आवडायचे.

६४ : मी भरून पावले आहे