कधीच पाहिली नव्हती. पुढे काय घडेल याची कल्पनाच नव्हती. आम्ही दोघे दुसऱ्या दिवशी पळून वसईत निघून आलो. तिथे गेल्यावर मुंबईत काय चाललं आहे, जरासुद्धा कळलं नाही."
आता मंडळाचं काम करायचं असं मी जेव्हा ठरवलं ना, तेव्हा कशा प्रकारे सुरुवात करावी असा विचार पडला. अंधेरीला बायकांचा जो ग्रूप आहे तो माझ्या ओळखीचा होता. तिथं मी आठ दिवसांनी, पंधरा दिवसांनी ऑफिस सांभाळून जायची. त्यांना जमा करायची. त्यांचे घरगुती प्रश्न समजून घ्यायची. या घराच्या आसपास नाही पण जवळ राहाणारा अंधेरीचाच आम्ही एक वकील नेमला होता. त्या वेळी काही शहाबानू केस झालेली नव्हती. त्यामुळे कोर्टामध्ये केस चालू व्हायची पोटगीसाठी. काही बायकांना मध्ये असं ठेवलं होतं की कोणी अडचणीत सापडलेली बाई आली तर तिला माझ्याकडे घेऊन यायचं. नंतर विचारपूस करायची. तिच्या नवऱ्याच्या घरच्या लोकांना भेटायचं. दोघांची बाजू समजून घ्यायची. आणि मग त्यांना मी सांगायची की वकिलाकडे जा. ते वकील आम्हांला फ्री सल्ला देत होते. पुरुष वकील होते एक. त्यांचं नाव तिरोडकर. त्यांच्याकडे पाठवायची. बायकांना ते प्रश्न विचारायचे ना, तर बायका बोलायच्याच नाहीत. वर्ष गेलं, दोन वर्षे गेली. मग एकदा त्यांनी सांगितलं की, बाई, या तुमच्या बायका तोंडातून शब्दपण काढत नाहीत. मी कसं काम करू? वकील हिंदूच. आमच्या केसेस मुस्लिम वकील घेतच नाहीत. धर्माच्या विरुद्ध बोलल्यानंतर ते केसेस लढवणार कसे? ते घेतच नव्हते. तिरोडकर म्हणाले, 'तुम्हांला एक बाई वकील देतो.' ओवळेकर बाई म्हणून होती, तिची भेट घालून दिली. अंधेरीलाच रहायची. अंधेरीच्याच कोर्टात काम करायची. तिच्याकडे बायका मी पाठवायची. अशीच लैला पटेल म्हणून होती. तिची केस सांगते. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. तिला तीन मुलं. तिला नवरा नांदवत नव्हता. देखणी हं, फार वयाची नाही. गोरी गोरी पान. छान दिसायला. स्वयंपाक उत्तम करायची. भाकऱ्या-बिकऱ्या तिच्या हातच्या बघण्यासारख्या. संसार तिनं खूप चांगला केला असेल. मी तिच्याबरोबर असल्यामुळे माझ्या लक्षात यायचं. ती माझ्या घरी यायची कधी कधी आणि मला आई, ममा ममा म्हणायची. कधी भाकरी भाज, कधी मटणाचं कालवण कर, हे सगळं करून घालायची. तर हे सगळं टेस्टी लागायचं. बरं घरकामात सुद्धा चांगली. साधं ती झाडू-फडका मारताना सुद्धा आपण तिचं बघून शिकावंसं वाटे. इतकं चांगलं तिचं काम असे. घरगुतीच काम. ती काही बाहेर जायची नाही. शिकलेली बिकलेली अजिबात नाही. नंतर तिला मी
मी भरून पावले आहे : १९१