पान:मी भरून पावले आहे.pdf/197

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोलिसांच्या गाडीत गुपचूप घेतलं. कोणाला कळलं नाही. त्या गाडीवर दगडफेक खूप झाली. हळूच पोलिसांनी मला लपवलं. मुमताज रहिमतपुरेनी ते बघितल्यानंतर ती म्हणाली, मी भाभीबरोबर रहाते. तिला एकटीला नेऊ नका तुम्ही. आणि मुमताज नि मी पोलिसांच्या गाडीत खाली बसून होतो. एस.टी.वर दगडफेक खूप झाली. जेमतेम ती पोलीस ठाण्याच्या आवारात गेली. नंतर परभणीहून, नांदेडहून मॉब जमा झाला होता. १४-१५ हजारांचा मॉब होता नगरमध्ये. असा उभाच्या उभा. तिथं पोलीस कमिशनर अरविंद इनामदारसाहेब यांना भेटून मी व मुमताज रहिमतपुरेनं निवेदन दिलं. ते म्हणाले, 'बाहेर सगळी गर्दी जमलेली आहे. तुमची गाडी समोरच आहे. तुम्हांला आता बाहेर कसं जाता येईल, बघू या.' आमच्या गाडीच्या सगळ्या काचा फुटलेल्या होत्या. ड्रायव्हरला पण असं गुंडाळून ठेवलं होतं, का तर ड्रायव्हर तटला नि थांबला तर सगळी बस जाळून टाकतील. त्यांचा काही भरवसा नाही. पण इनामदार साहेबांची सुद्धा कमाल की एवढ्या मॉबमध्ये पुढे जाऊन सगळ्यांना त्यांनी एका बाजूला केलं नि आमची एस.टी. तिथून बाहेर पडली. कुठं जायचं? थारा नाही. म्हटलं, इथून बाहेर पडा. मीटिंग कसली होतेय? हा सगळा तमाशा झाल्यावर मीटिंग म्हणजे मेलो असतो सगळे. मग बाहेर पडलो ते थेट पुणं गाठलं. पुण्याला काही प्रोग्रॅम नव्हता. ११ ला पोहोचलो रात्री. मग पोलीस आवारातच थांबलो. थोडा वेळ. ते म्हणाले, रात्रभर थांबता येणार नाही तुम्हांला. मग बाहेर जाऊन लोकांनी चपाती-भाजी काय काय आणलं, खाल्लं. राष्ट्र सेवादलाचं साने गुरुजी स्मारक आहे नं, तिथं गेलो. थांबलो रात्रभर. अर्ध्या रात्री उठलो. म्हटलं, आपण एस.टी. बदलूया. डेपोवर गेलो. त्यांनी सांगितलं, 'नाही, ही एस.टी. तुम्हाला दिलेली आहे. काचा फुटल्या असल्या तरी चांगल्या कंडिशनमध्ये आहे. आमच्या गाड्या चांगल्या कंडिशनमध्ये नाहीत. कोल्हापूरपर्यंत जाणार नाहीत. तुम्हांला अडकायला होईल. मग सगळ्या कोल्हापूरवाल्यांना त्याच्यात भरलं. मुंबईचे ३-४ लोक होते. बाबूमियाँ होते. त्यांच्याबरोबर २-४ माणसं. त्यांना मग श्रीगोंद्याला वेगळ्या एस.टी.ने पोचवलं. नि मी म्हटलं आपण साध्या ट्रेननं जाऊ या. कोण ओळखणारे आपल्याला? पण पोलीस आमच्याबरोबर होते. त्यांच्याबरोबर आम्ही घरापर्यंत गेलो. घरी गेल्यानंतर पोलीस कमिशनरला फोन केला. माझ्याशी ते फोनवर बोलले आणि लिहून घेतलं माझ्याकडून की आम्ही सुखरूप पोचलो म्हणून.

 आता ह्या मोर्चामध्ये काही गोष्टी मला शिकायला मिळाल्या. मी भाषण

१८२ : मी भरून पावले आहे